कुस्तीपटू राहुल अवारेचा रिपोर्टही पॉझिटिव्ह

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 7 September 2020

शिबिरासाठी दाखल झाल्यानंतर नियमानुसार तो क्वारंटाइन होता.  त्यामुळे अन्य कोणताही खेळाडू त्याच्या संपर्कात आलेला नाही, असेही साईने निवेदनात म्हटले आहे.

जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक विजेता कुस्तीपटू राहुल अवारेलाही कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. राष्ट्रीय शिबिरासाठी सोनीपतला दाखल झाल्यानंतर करण्यात आलेल्या चाचणीवेळी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोरोनाची लागण झालेला राहुल अवारे पाचवा मल्ल आहे. यापूर्वी महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, दीपक पुनिया, नीवन आणि कृष्ण या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती.  भारतीय क्रीडा प्राधीकरणाने (साई) या वृत्ताला दुजोरा दिलाय. प्रोटोकॉलनुसार त्याला साई पॅनेलच्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. 

आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर...

अवारेने मागील वर्षी नूर सुल्तान येथे झालेल्या जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत 61 किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली होती. शिबिरासाठी दाखल झाल्यानंतर नियमानुसार तो क्वारंटाइन होता.  त्यामुळे अन्य कोणताही खेळाडू त्याच्या संपर्कात आलेला नाही, असेही साईने निवेदनात म्हटले आहे.    
यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या दीपक पुनियामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्याला होम क्वारंटाइनचा सल्ला देखील देण्यात आलाय. महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने कोरोनावर मात केली होती. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर देखील खबरदारी म्हणून ती देखील सध्या होम क्वारंटाइनच आहे.  


​ ​

संबंधित बातम्या