कुस्तीपटू दीपक पुनिया कोरोनामुक्त 

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 6 September 2020

‘राष्ट्रीय शिबिरात पोहचल्यानंतर कोविडची तपासणी करण्यात आली, त्यात पॉझिटिव्ह अहवाल आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र आता त्याला घरी सोडण्यात आले आहे. सोबतच काही काळ घरी थांबण्याचा सल्ला संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे,’ अशी माहिती भारतीय क्रीडा प्राधिकरणाने ट्‌विट करून दिली.

नवी दिल्ली : आघाडीचा कुस्तीपटू दीपक पुनिया (८५ किलो) याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. याआधी कुस्ती महासंघाच्या सोनिपत येथील राष्ट्रीय शिबिराला हजेरी लावलेल्या तीन पुरुष कुस्तीपटूंना कोरोनाची लागण झाली आहे. यात जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करणारा दीपक पुनियासह नवीन (६५ किलो) आणि क्रिशन (१२५ किलो) या मल्लांचा समावेश होता.

आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर 

‘राष्ट्रीय शिबिरात पोहचल्यानंतर कोविडची तपासणी करण्यात आली, त्यात पॉझिटिव्ह अहवाल आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र आता त्याला घरी सोडण्यात आले आहे. सोबतच काही काळ घरी थांबण्याचा सल्ला संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे,’ अशी माहिती भारतीय क्रीडा प्राधिकरणाने ट्‌विट करून दिली. परिणामी प्रशिक्षक व सहायक कर्मचाऱ्यांसह सर्व कुस्तीपटूंनी शिबिराला आल्यानंतर कोरोना संबंधित आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आलेले होती. याव्यतिरिक्त यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतील आपले स्थान निश्‍चित केले आहे.


​ ​

संबंधित बातम्या