क्रीडा विभागातून कुस्तीपटू बबीता फोगटचा राजीनामा

टीम ई-सकाळ
Thursday, 8 October 2020

हरियाणाच्या क्रीडा व युवा व्यवहार विभागातील उपसंचालक पदावर असलेल्या कुस्तीपटू बबीता फोगटने काल  बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

हरियाणाच्या क्रीडा व युवा व्यवहार विभागातील उपसंचालक पदावर असलेल्या कुस्तीपटू बबीता फोगटने काल  बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  बबीता फोगटची हरियाणा सरकारने 29 जुलै रोजी क्रीडा व युवक व्यवहार विभागात उपसंचालक म्हणून नियुक्ती केली होती. बबिताला हरियाणाच्या उत्कृष्ट खेळाडू (भरती व सेवा अटी) नियम, 2018 अंतर्गत उपसंचालक (क्रीडा) पदावर नियुक्ती करण्यात आली होती. 

बबीताला यापूर्वी हरियाणाच्या पोलिस खात्यात सब-इन्स्पेक्टर पदावर नियुक्त करण्यात आले होते. परंतु तिने राज्यातील विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी राजीनामा दिला होता. आणि भाजपच्या तिकिटावर दादरी येथून निवडणूक लढविली होती. तर तिचा या निवडणुकीत पराभव झाला होता. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बबिता फोगट प्रसिद्ध कुस्ती प्रशिक्षक महावीर फोगट यांची मुलगी असून, 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तीने सुवर्णपदक जिंकले होते. 

टी -20 क्रिकेटबाबत गावस्करांनी सुचवला पर्याय ; गोलंदाजांवरील दबाव कमी होणार? 

आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बबीता फोगटने सोशल माध्यमावरील ट्विटर वरून पक्ष सेवेसाठी काम करणार असल्याचे म्हटले आहे. तर बबिताने आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजीनामा दिल्याचे समजते.  


​ ​

संबंधित बातम्या