नेमबाजांची आजपासून विश्वकरंडक चाचणी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 June 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी झालेली पूर्वतयारी भारतीय नेमबाजांना ओसिएक विश्वकरंडक स्पर्धेतून जाणून घेता येईल. एका महिन्यापूर्वी क्रोएशियात ऑलिंपिक सरावासाठी दाखल झालेल्या भारतीय नेमबाजांची ही पहिली स्पर्धा आहे.

मुंबई - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी झालेली पूर्वतयारी भारतीय नेमबाजांना ओसिएक विश्वकरंडक स्पर्धेतून जाणून घेता येईल. एका महिन्यापूर्वी क्रोएशियात ऑलिंपिक सरावासाठी दाखल झालेल्या भारतीय नेमबाजांची ही पहिली स्पर्धा आहे.

भारतीय नेमबाजांनी युरोपीय स्पर्धेत आपला कस आजमावला होता, पण त्यांचा सहभाग सराव गटातच होता. त्यामुळे भारतीय नेमबाज प्रत्यक्ष स्पर्धेत नव्हते. यामुळे ऑलिंपिक नेमबाजांसाठी ही महत्त्वाची स्पर्धा आहे.

या स्पर्धेत भारतीय नेमबाज आपल्या स्थानापेक्षा गुणांना तसेच स्पर्धेतील प्रत्यक्ष कामगिरीच्या वेळी काय चुका होतात याकडे लक्ष देतील. त्यामुळेच स्पर्धा संपल्यावर भारतीय नेमबाज लगेचच आपल्या झॅग्रेब येथील सरावाच्या ठिकाणी परतणार आहेत.


​ ​

संबंधित बातम्या