महिला हॉकीच्या यशाला मुंबईचा ‘ट्रॅक’

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 August 2021

भारतीय महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकदार विजय मिळवित उपांत्य फेरीत धडक मारली. भारतीय महिला संघाच्या यशात मुंबईतील मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वेतील सेवेत असलेल्या एकंदर सहा खेळाडूंचा मोलाचा सहभाग आहे.

मुंबई - भारतीय महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकदार विजय मिळवित उपांत्य फेरीत धडक मारली. भारतीय महिला संघाच्या यशात मुंबईतील मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वेतील सेवेत असलेल्या एकंदर सहा खेळाडूंचा मोलाचा सहभाग आहे.

नवनीत कौर, दीपग्रेस एक्का, वंदना कटियार, रजनी, मोनिका आणि सुशीला चानू या मुंबईतील रेल्वेत काम करणाऱ्या खेळाडू भारतीय संघात आहेत. या सहाही खेळाडू तिकीट तपासनीस आहेत. या सर्वांनी आता भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यातील वंदना कटियारने तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या साखळी सामन्यात हॅट््‌ट्रिक केली होती.

पश्चिम रेल्वेतील खरे तर चौघींची निवड झाली असती, पण दोघींना ओडिशा सरकारने त्यांच्या सेवेत घेतले, त्यामुळे सध्याच्या संघातील दोघी पश्चिम रेल्वेतील आहेत. दीपग्रेस एक्का मुंबई सेंट्रलला २०१२ मध्ये आली आहे; तर नवनीत २०१४ पासून आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकल्यामुळे त्यांना सांताक्रूझला रेल्वेचे क्वार्टरही देण्यात आले आहे. असे पश्चिम रेल्वेतील अधिकारी मनोरमा यांनी सांगितले.

मध्य रेल्वेतील सर्व खेळाडू छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे तिकीट तपासनीस आहेत, तसेच त्या माटुंगा येथील रेल्वे क्वार्टरमध्ये राहतात.


​ ​

संबंधित बातम्या