वेटलिफ्टर अंचिता शेऊलीस रौप्य

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 May 2021

भारताच्या अंचिता शेऊली याने जागतिक कुमार वेटलिफ्टिंग स्पर्धेत ७५ किलो गटात रौप्यपदक जिंकले. ताश्कंदला सुरू असलेल्या या स्पर्धेत अंचिताने एकूण ३१३ किलो वजन उचलताना तीन वरिष्ठ राष्ट्रीय, तसेच चार राष्ट्रीय कुमार विक्रम मोडले.

मुंबई - भारताच्या अंचिता शेऊली याने जागतिक कुमार वेटलिफ्टिंग स्पर्धेत ७५ किलो गटात रौप्यपदक जिंकले. ताश्कंदला सुरू असलेल्या या स्पर्धेत अंचिताने एकूण ३१३ किलो वजन उचलताना तीन वरिष्ठ राष्ट्रीय, तसेच चार राष्ट्रीय कुमार विक्रम मोडले.

अंचिताने स्नॅचमध्ये १४१ तसेच क्लीन अँड जर्कमध्ये १७२ किलो वजन उचलण्याची कामगिरी केली. त्याने स्नॅचमध्ये राष्ट्रीय वरिष्ठ विक्रम केला, तसेच एकंदरीत वजन उचलण्याचा या गटातील विक्रमही केला. कुमार गटात त्याने त्याच्याच नावावर असलेले विक्रम मोडले. अंचिता ताश्कंद स्पर्धेत स्नॅच प्रकारानंतर तिसरा होता. त्याला रशियाच्या गेवॉर्ग सेरोबियनन याने दोन किलोने मागे टाकले होते. मात्र क्लीन अँड जर्कमध्ये अंचिताने रशियाच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा सात किलो वजन जास्त उचलले आणि रौप्यपदक निश्चित केले.


​ ​

संबंधित बातम्या