सेलर ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी विष्णू  टोकियोत दाखल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 July 2021

मुंबईचा सेलर विष्णू सर्वानन याच्यासह भारतीय सेलिंग संघ ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी टोकियोत दाखल झाला आहे. ऑलिंपिक स्पर्धेसाठी टोकियोत दाखल झालेला हा पहिलाच भारतीय संघ आहे.

मुंबई - मुंबईचा सेलर विष्णू सर्वानन याच्यासह भारतीय सेलिंग संघ ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी टोकियोत दाखल झाला आहे. ऑलिंपिक स्पर्धेसाठी टोकियोत दाखल झालेला हा पहिलाच भारतीय संघ आहे. आता तीन दिवसांच्या विलगीकरणानंतर या खेळाडूंचा टोकियोतील सराव सुरू होईल. 

विष्णूसह नेत्रा कुमानन, वरुण ठक्कर, गणपती चेंगप्पा हे सेलरही टोकियोत दाखल झाले आहेत. विष्णू लेसर स्टँडर्ड क्लास प्रकारात; तर नेत्रा लेसर रेडियल प्रकारात सहभागी होईल. वरुण आणि गणपती चेंगप्पा या जोडीचा ४९ र्इआर प्रकारात सहभाग असेल.

सेलिंग संघातील सर्व खेळाडू परदेशात सराव करीत असल्याने त्यांना कठोर विलगीकरणास सामोरे जावे लागणार नाही. विष्णू माल्टामध्ये; तर नेत्रा स्पेनमध्ये सराव करीत होते. वरुण आणि गणपती चेंगप्पाने पोर्तुगालला पसंती दिली होती. हे सर्व खेळाडू युरोपातून आल्यामुळे त्यांना कठोर निर्बंधास सामोरे जावे लागणार नाही.


​ ​

संबंधित बातम्या