कुमार कुस्तीसाठी वेताळ, पृथ्वीराजची निवड

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 July 2021

वेताळ शेळके आणि पृथ्वीराज पाटील यांची जागतिक कुमार कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा १६ ऑगस्टपासून रशियात होणार आहे.

मुंबई - वेताळ शेळके आणि पृथ्वीराज पाटील यांची जागतिक कुमार कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा १६ ऑगस्टपासून रशियात होणार आहे. 

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये निवड चाचणीत वेताळने ८६ किलो वजनी गटात, तर पृथ्वीराजने ९२ किलो वजनी गटात बाजी मारली. दोघांनी हरियाना, दिल्ली तसेच पंजाबच्या कुस्तीगिरांना पराजित करुन भारतीय संघातील स्थान निश्चित केले.  

मूळचा सोलापूरचा असलेला वेताळ पुण्यातील आंतराष्ट्रीय कुस्ती संकुलात काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव  करतो. कोल्हापूरचा पृथ्वीराज शिंगणापूर (कोल्हापूर) येथील शाहू कुस्ती केंद्रात खेळाचे धडे गिरवत आहे. त्याला जालिंदर मुंडे तसेच शिवाजी पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. उफा येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी फ्रीस्टाईल, ग्रीको रोमन तसेच मुलींच्या स्पर्धेसाठी एकंदर ३० कुस्तीगीरांची निवड करण्यात आली आहे.


​ ​

संबंधित बातम्या