उत्तर प्रदेश सरकार देणार ऑलिंपिक पदक जिंकणाऱ्यांस ६ कोटी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 July 2021

आगामी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या उत्तर प्रदेशच्या प्रत्येक खेळाडूला ६ कोटींच्या बक्षिसाची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

लखनौ - आगामी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या उत्तर प्रदेशच्या प्रत्येक खेळाडूला ६ कोटींच्या बक्षिसाची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. 

उत्तर प्रदेशमधील १० खेळाडू आतापर्यंत ऑलिंपिकसाठी पात्र ठरले आहेत. तसेच रौप्य व ब्राँझ जिंकणाऱ्या खेळाडूला अनुक्रमे चार व दोन कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच सांघिक स्तरावर सुवर्ण, रौप्य व ब्राँझ जिंकणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे तीन, दोन व एक कोटींचे बक्षीस देण्यात येईल. याव्यतिरिक्त राज्यातून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूस त्यांच्या कामगिरीनुसार १० लाखांपासून पुढे बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. 


​ ​

संबंधित बातम्या