टोकियो ऑलिंपिक होणारच

पीटीआय
Sunday, 9 May 2021

जपानमध्ये कोविड आणीबाणी लावण्यात आली आहे, ऑलिंपिकसाठी तेथे सर्वत्र विरोध होत आहे, तरीही ऑलिंपिक स्पर्धा घेण्याचा विश्वास आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने व्यक्त केला.

टोकियो - जपानमध्ये कोविड आणीबाणी लावण्यात आली आहे, ऑलिंपिकसाठी तेथे सर्वत्र विरोध होत आहे, तरीही ऑलिंपिक स्पर्धा घेण्याचा विश्वास आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने व्यक्त केला, ऑलिंपिक काहीही रोखू शकत नसल्याचेही त्यांना ठामपणे सांगितले.

टोकियोत कोविड आणीबाणी वाढविण्यात आली आहे. या ठिकाणी २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या ऑलिंपिकला  सध्याच्या महामारीचा काहीच धोका नसल्याचे आयओसीला वाटत आहे. आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्या भेटीपूर्वी उपाध्यक्ष आणि आयओसी समन्वय समितीचे प्रमुख जॉन कॉटस्् यांनी कोरोनाचे भय असले तरी स्पर्धा ठरल्यानुसाच होईल, असे शनिवारी सांगितले. 

दोन ते तीन आठवड्यांपूर्वी जपानच्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या अध्यक्षांना स्पर्धा पुढे ढकलण्याची अजिबात शक्यता नसल्याचे सांगितले आहे. त्यांनी आयओसीलाही तशीच ग्वाही दिली आहे. सर्व सुरक्षिततेच्या बाबींसंदर्भात आम्ही जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्यासमवेत काम करत आहोत, स्पर्धा ठरल्यानुसारच होईल, असे जॉन कॉटस्् म्हणाले. कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी टोकियो आणि जपानमधील इतर शहरात सध्या लागू असलेली आणीबाणी ३१ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. जपानमध्ये लसीकरणाचा वेग संथ असून ऑलिंपिक्स लांबणीवर टाकणे किंवा रद्द करण्याचे मत बहुतांश जपानी जनतेने व्यक्त केले आहे. त्यामुळे सरकार दबावाखाली आहे.

सुरक्षिततेवर भर
1) जपानी नागरिक आणि अॅथलिट्सच्या सुरक्षिततेसंदर्भात तजवीज करणारे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे, असे कॉटस्् यांचे म्हणणे आहे. टोकियो ऑलिंपिकनिमित्त स्पर्धक आणि कर्मचारी यांच्या लसीकरणासंदर्भात आयओसीने लस उत्पादक फायझर आणि बायोन्टेक यांच्याशी करार जाहीर केला आहे. जपानमध्ये प्रवास करण्यापूर्वी अॅथलिट्ससाठी लस उपलब्ध करून देण्यासंदर्भात राष्ट्रीय क्रीडा संस्थेशी समन्वय साधण्याचे औषध उत्पादकांनी स्पष्ट केले आहे. 

2) गतवर्षीचा पूर्वार्ध आम्ही सर्वांत वाईट परिस्थिती ओळखण्यासाठी खर्च केलेला आहे, असे कोट्स यांनी सांगितले. त्यानंतर पुढील सहा महिने आम्ही आवश्यक असलेल्या प्रतिरोधकावर खर्च केले आहेत,  लस नाही हे मानून या प्रतिरोधकांची आम्ही अंमलबजावणी करणार आहोत, त्यामुळे परिस्थिती सुधारेल. स्पर्धा ठरल्यानुसारच होईल, असे जॉन कोट्स म्हणाले.

खेळाडूंवर बोजा नाही
आयओसी जपानवर दबाव किंवा खेळाडूंवर आर्थिक बोजा टाकणार नाही. आम्ही घेणार असलेली सावधगिरी खेळाडू आणि जपानमधील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेच असेल. या प्रक्रियेत आम्ही आश्चर्यकारक काम केले असून त्यामुळे चाचणीच्या माध्यमातून खेळाडूंच्या सुरक्षिततेची खात्री बाळगता येईल. आता जगभरातील सर्व खेळाडूंना लसीकरणाची मुभा असल्याने त्यास चालना मिळाली आहे, असेही जॉन कोट्स यांनी नमूद केले.


​ ​

संबंधित बातम्या