प्रियांका-राहुल यांनी मिळवलं ऑलिम्पिकचं तिकीट

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 13 February 2021

गोस्वामीने महिला गटातील अ वर्गात एक तास 28 मिनिटे आणि 45 सेकंद वेळ घेतला. पुरूष वर्गात दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या राहुलने एक तास 20 मिनिटे आणि 26 सेकंद वेळेत अंतर पार करत ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले.

Olympics 2021 Qualifiers : भारताचे तीन रेसवॉकर (चालण्याच्या शर्यतीतील खेळाडू) ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. राष्ट्रीय ओपन रेसवॉकिंग चॅम्पियनशिपच्या माध्यमातून तीन खेळाडूंची निवड करण्यात आली. यात पुरुष गटातून  संदीप कुमार आणि महिला गटातून प्रियांका गोस्वामीने ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. प्रियांकाने पुरूष आणि महिला गटात मिळून 20 किलोमीटर प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. 

कोरोनाच्या संकटानंतर राष्ट्रीय ओपन रेसवॉकिंग चॅम्पियनशिपच्या रुपात देशात महत्वपूर्ण मैदानी स्पर्धा पार पडत आहे. आतापर्यंत भारताच्या 5 खेळाडूंनी रेसवॉकर खेळ प्रकारात टोकियो ऑलिम्पिक तिकीट मिळवले आहे. केटी इरफान (पुरूष 20 किमी) आणि भावना जाट (महिला 20 किमी) यांनी यापूर्वीच पात्रता सिद्ध केली होती.  संदीपने एक तास 20 मिनिटे आणि 16 सेकंदात 20 किमी अंतर पार करत पुरुष गटात विजय नोंदवला.

Australian Open 2021 : जखमी वाघ सामना न सोडता लढला अन् जिंकलाही!

गोस्वामीने महिला गटातील अ वर्गात एक तास 28 मिनिटे आणि 45 सेकंद वेळ घेतला. पुरूष वर्गात दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या राहुलने एक तास 20 मिनिटे आणि 26 सेकंद वेळेत अंतर पार करत ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. टोकियो ऑलिम्पिकसाठी रेसवॉक पात्रतेसाठी पुरुष गटासाठी अंतर एक तास 21 मिनिटांत  तर महिला गटासाठी एक तास 31 मिनिटांत पार करायचे असते.

रिओ ओलिम्पिक 2016 मध्ये 50 किमी प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संदीपने 20 किमीमध्ये  इरफान आणि देवेंद्र सिंहचे एक तास 20 मिनिटे आणि 21 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.  इरफानने मार्च 2019 मध्ये जपानमधील नोमी येथील आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेतच टोकियो तिकीट मिळवले होते.  


​ ​

संबंधित बातम्या