चक दे फलटण! चिली दौऱ्यासाठी तिघींची भारतीय संघात वर्णी

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 9 January 2021

चिली दौऱ्यावर ज्यूनियर भारतीय महिला संघ 6 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 

Three Maharashtra phaltan Girls selected Indian junior womens hockey team : जग आणि देश कोरोनाजन्य परिस्थितीतून सावरत असताना खेळाची मैदाने आता खुली होत आहेत. भारतीय ज्यूनिअर महिला हॉकी संघ वर्ष उलटून गेल्यानंतर चिलीच्या मैदानातून अनलॉक होणार आहे. चिली दौऱ्यावर ज्यूनियर भारतीय महिला संघ 6 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

यासाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा झाली. सुमन देवीच्या नेतृत्वाखालील संघात फलटनच्या तिघींची निवड झाली आहे. अक्षता ढेकळे (डिफेंडर) ऋतूजा पिसाळ (फॉरवर्ड) वैष्णवी फाळके (मिडफिल्डर) या तिघी चिली दौऱ्यावर भारतीय संघासोबत जाणार आहेत. साताऱ्या जिल्ह्यातील लेकींची ही भरारी कौतुकास्पद अशीच आहे. प्रत्यक्ष सामन्यात त्यांना संधी मिळणार का? आणि ते कशी कामगिरी करणार हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

 

     Image may contain: 1 person, standing

AusvsInd Test : टीम इंडियाला जिथं खेळायचं नव्हतं ते शहर झालं लॉकडाऊन
 
 भारतीय महिला संघ न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धच्या तिरंगी मालिकेत डिसेंबर 2019 मध्ये अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर मार्चपासून कोरोना विषाणूच्या वेगाने पसरलेल्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण क्रीडा क्षेत्रही लॉकडाऊन झाले होते. यातून आता खेळ सावरत आहे.

Image may contain: 1 person

मोठ्या ब्रेकनंतर भारतीय संघ परदेस दौऱ्यावर कशी कमागिरी करणार हे पाहावे लागेल. भारतीय महिला संघ ज्यूनीअर चिली महिला हॉकी संघासोबत 17 आणि 18 जानेवारीला भिडणार आहेत. त्यानंतर उर्वरित चार सामने हे चिली महिला वरिष्ठ संघासोबत नियोजित आहेत. 20, 21, 23 आणि 24 जानेवारीला हे सामने नियोजित आहेत.  
Image may contain: 1 person, text that says 'ODISHA DIA'S BEST CEFT VAISHNAVI PHALKE Midfielder'

भारतीय ज्यूनिअर महिला संघ : खूशबू,रशनप्रित कौर,महिमा चौधरी, प्रियांका, सुमन देवी थोंडम (कर्णधार), गगनदीप कौर, इशिका चौधरी (उप-कर्णधार), सुष्मा कुमारी, अक्षता ढेकळे, बलजीत कौर, चेतना, मरियना कूजूर, अजमिना कूजूर, रित, प्रभलीन कौर, वैष्णवी फाळके,प्रीती, जीव किशोरी टोप्पो, मुमताज खान, ऋतूजा पिसाळ, संगिता कुमारी, ब्यूटी डूंगडूंग, लॅलरीनदीकी, दीपिका. 


​ ​

संबंधित बातम्या