बाख यांचे टोकियोत आणीबाणीने स्वागत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 July 2021

जेमतेम पंधरा दिवसांवर आलेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांचे टोकियोत आगमन झाले, पण टोकियोतील आणीबाणीने त्यांचे स्वागत केले. तीन दिवस विलगीकरणात राहिल्यानंतरच बाख टोकियोत फिरू शकतील.

टोकियो - जेमतेम पंधरा दिवसांवर आलेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांचे टोकियोत आगमन झाले, पण टोकियोतील आणीबाणीने त्यांचे स्वागत केले. तीन दिवस विलगीकरणात राहिल्यानंतरच बाख टोकियोत फिरू शकतील.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे मुख्यालय टोकियोतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आहे. त्याच हॉटेलमध्ये बाख याचे विलगीकरण होईल. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा असताना जपानमध्ये आणीबाणी असेल. त्यामुळे ही स्पर्धा प्रेक्षकांविना होईल, हे जवळपास निश्चित आहे. केवळ याची अधिकृत घोषणा शिल्लक आहे. 

बाख यांनी स्पर्धेच्या सुरक्षित संयोजनासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक निर्णयास आमची साथ असेल, असे सांगितले आहे. 

ऑलिंपिक स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडलेल्या चाहत्यांना मद्य घेण्यापासून कसे रोखणार हा प्रमुख प्रश्न आहे, असे जपानचे आरोग्यमंत्री नोरीहिसा तामुरा यांनी सांगितले. त्यांनी याद्वारे ऑलिंपिक कालावधीत बारवरील प्रतिबंध वाढणार असल्याचेच संकेत दिले. यापूर्वीच टोकियो प्रशासनाने टोकियोतील ऑलिंपिक ज्योतीच्या प्रवासावर पूर्ण निर्बंध घातले आहेत. त्यामुळे सध्या ही ज्योत टोकियोच्या परिसरात असलेल्या बेटांवरच फिरत आहे.


​ ​

संबंधित बातम्या