ऑलिंपिक रद्द करण्याचा सध्या पर्यायच नाही; योशिहिदे सुगा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 July 2021

कोरोना रुग्ण कमी होत आहेत, त्यामुळे ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा रद्द करण्याचा सध्या पर्यायच नाही, असे जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी सांगितले. त्यांनी ऑलिंपिक स्पर्धा घरातच बघा, निष्कारण आणीबाणीची परिस्थिती निर्माण करू नका असेही त्यांनी सांगितले.

टोकियो - कोरोना रुग्ण कमी होत आहेत, त्यामुळे ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा रद्द करण्याचा सध्या पर्यायच नाही, असे जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी सांगितले. त्यांनी ऑलिंपिक स्पर्धा घरातच बघा, निष्कारण आणीबाणीची परिस्थिती निर्माण करू नका असेही त्यांनी सांगितले.

कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी ऑलिंपिक स्पर्धा थांबवणे योग्य होईल का, असा प्रश्न सुगा यांना थेट विचारण्यात आला; मात्र सुगा यांनी ही शक्यता नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, सध्या अमलात असलेले निर्बंध तसेच लोकांची असलेली साथ यामुळे रुग्णसंख्या कमी होत आहे. ऑलिंपिक रद्द करण्याचा पर्याय विचारात आहे का, असे विचारल्यावर रुग्णांत घट होत आहे, त्यामुळे हा पर्याय विचारात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी आणीबाणी असताना बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या कमी होती. ती सध्या वाढत आहे, पण रुग्णालयात दाखल केलेल्यांचे वय सध्या ४० ते ५० च्यादरम्यान आहे. त्यात डेल्टाचे रुग्ण जास्त आहेत. स्थानिक प्रशासनासह चर्चा करून ती वाढ कमी करण्याचा प्रयत्न होईल असे त्यांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या