वार्षिक करारातूनही सुशीलची गच्छंती?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 May 2021

खुनाच्या आरोपामुळे अटकेत असलेल्या सुशील कुमारवर एकामागोमाग एक संकटे येत आहेत. कुस्ती स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी होत नसल्यामुळे सुशीलसह महिला कुस्तीगीर पूजा धांदा यांना वार्षिक करारातून बाहेर काढण्यात येणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

नवी दिल्ली - खुनाच्या आरोपामुळे अटकेत असलेल्या सुशील कुमारवर एकामागोमाग एक संकटे येत आहेत. कुस्ती स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी होत नसल्यामुळे सुशीलसह महिला कुस्तीगीर पूजा धांदा यांना वार्षिक करारातून बाहेर काढण्यात येणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

पुढील महिन्यात कुस्ती महासंघाची बैठक होत आहे, त्यात करारासंदर्भात आढावा घेतला जाणार आहे. ही बैठक कुस्ती महासंघ आणि प्रायोजक टाटा मोटर्स यांच्यात होणार आहे. २०२० मध्ये होणारी ही बैठक कोरोमामुळे लांबणीवर पडली होती. सुशीलला करारातून हद्दपार करणे त्याच्यावरील खुनाच्या आरोपांमुळे नव्हे, तर सुमार कामगिरीमुळे असेल, असे कुस्ती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या