सुशीलला घटनास्थळी नेऊन चौकशी करण्यात आली

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 May 2021

ऑलिंपिक पदकवीर सुशील कुमारवरील खुनाच्या आरोपांचा तपास गुन्हा अन्वेषण खात्याने सुरू केला असून छत्रसाल स्टेडियमच्या घटनास्थळी सुशीलला नेण्यात आले आणि तो प्रसंग पुन्हा तयार करण्यात आला.

नवी दिल्ली - ऑलिंपिक पदकवीर सुशील कुमारवरील खुनाच्या आरोपांचा तपास गुन्हा अन्वेषण खात्याने सुरू केला असून छत्रसाल स्टेडियमच्या घटनास्थळी सुशीलला नेण्यात आले आणि तो प्रसंग पुन्हा तयार करण्यात आला.

सुशील आणि त्याचा सहकारी अजय यांना घेऊन पोलिस सकाळीच घटनास्थळी आले. तेथे ते दुपारपर्यंत होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

तो क्षण पुन्हा तसाच तयार करून सुशील आणि अजय यांच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. घटनास्थळीही सुशीलची चौकशी करण्यात आली. खुनाच्या या आरोपांसह सुशीलची इतर बाबतीतही चौकशी करण्यात येत आहे. गँगस्टरबरोबरचे संबंधही तपासले जात आहेत. तसेच छत्रसालधील मारहाणीत सुशीलचा नेमका कोणता हेतू होता हेसुद्धा तपासले जात आहे.

हाणामारीची ही घटना घडली त्याचे सीसी टीव्ही फुटेज दिल्ली पोलिसांनी मिळवले आहेत.

रेल्वेच्या नोकरीतून निलंबित
खुनाच्या आरोपामुळे सुशील कुमार नोकरी करत असलेल्या उत्तर रेल्वेने त्याला निलंबित केले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत तो निलंबित असेल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.


​ ​

संबंधित बातम्या