परदेशातील शिबिरांत कोरोना नियमांचे कसोशीने पालन करा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 May 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी सराव करण्यासाठी विविध देशांत तुम्ही जाणार आहात. तेथील कोरोनाविषयक नियमावलीचा कोणत्याही प्रकारे भंग करू नका, अशी सूचना केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी भारतीय खेळाडूंना केली.

नवी दिल्ली - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी सराव करण्यासाठी विविध देशांत तुम्ही जाणार आहात. तेथील कोरोनाविषयक नियमावलीचा कोणत्याही प्रकारे भंग करू नका, अशी सूचना केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी भारतीय खेळाडूंना केली. 

भारतीय नेमबाज ऑलिंपिकपूर्व शिबिरासाठी खास विमानाने क्रोएशियास रवाना होतील. नेमबाजी संघास शुभेच्छा देताना सराव करणाऱ्या देशातील कोरोनाप्रतिबंधक नियमांचे कसोशीने पालन करा. या दौऱ्याच्या वेळी पूर्णपणे सरावावर लक्ष केंद्रित करा. स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा, असे ट्विट रिजीजू यांनी केले आहे. 

बंगळूर एफसी संघातील दोन खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याने मालदीवमध्ये कोरोना नियमाचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांना देश सोडण्यास सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या