ऑलिंपिक मॅरेथॉन शर्यत पाहायला येण्यास अटकाव

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 July 2021

ऑलिंपिक सिटी टोकियोतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रतिष्ठित ऑलिंपिक मॅरेथॉनच्या मार्गापासून नागरिकांना दूर राहण्यास सांगण्यात आले आहे.

टोकियो - ऑलिंपिक सिटी टोकियोतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रतिष्ठित ऑलिंपिक मॅरेथॉनच्या मार्गापासून नागरिकांना दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. 

यापूर्वीही टोकियोतील उष्णतेमुळे मॅरेथॉनचा राजधानीतून जाणारा मार्ग ''सपोरो'' येथे हलविण्यात आल्यानंतर त्यावर विवाद झाला होता. त्यातच आता नागरिकांकडून मॅरेथॉनमधील खेळाडूंना संसर्ग होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे संयोजन समितीकडून सांगण्यात आले. ७ व ८ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या पुरुष व महिला मॅरेथॉनच्या नियोजनासाठी स्थानिक प्रशासन व पोलिस यांची नुकतीच संयोजकांकडून भेट घेण्यात आली. त्यानंतर 'होकायाडो' व 'सपोरो' येथील नागरिकांसाठी पत्रक काढून हा निर्णय घेण्यात आला. अनेक कारणांमुळे ऑलिंपिक स्पर्धेस स्थानिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे.


​ ​

संबंधित बातम्या