सोनमने आक्रमकता कायम ठेवायला हवी होती

दिनेश गुंड
Wednesday, 4 August 2021

सोनम मलिकला आज पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला. सुरुवातीपासूनच आक्रमक धोरण धारण केलेली सोनम मंगोलियाच्या बोलेरतुयाला निष्प्रभ करण्यात यशस्वी ठरली आणि पंचांनी मंगोलियाच्या कुस्तीगिराला कुस्तीची टाळाटाळ करण्याची समज दिली.

सोनम मलिकला आज पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला. सुरुवातीपासूनच आक्रमक धोरण धारण केलेली सोनम मंगोलियाच्या बोलेरतुयाला निष्प्रभ करण्यात यशस्वी ठरली आणि पंचांनी मंगोलियाच्या कुस्तीगिराला कुस्तीची टाळाटाळ करण्याची समज दिली. त्यानंतरदेखील सोनम आक्रमक राहिल्यामुळे पुन्हा मंगोलियाच्या कुस्तीगिराला निष्क्रियता देऊन ३० सेकंदांचा ऍक्‍टिव्हिटी पीरिएड देण्यात आला. या ३० सेकंदांतील चार सेकंद बाकी असताना मंगोलियन कुस्तीगिर सोनमचे आक्रमण थोपविताना संरक्षक क्षेत्रात गेली त्यामुळे सोनमला १ गुण देण्यात आला. कुस्तीच्या मध्यंतराला सोनम एका गुणाने आघाडीवर होती. मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सोनमचे आक्रमण थोपविताना बोलेरतुया ब्राऊन झोनच्या बाहेर गेली. डावाच्या पकडीतून पळाल्याबद्दल मंगोलियन कुस्तीगिराला ताकीद, तर सोनमला एक गुण देण्यात आला. अशा प्रकारे सोनमला २-० ची आघाडी मिळाली. 

दोन मिनिटे बाकी असताना सोनमने आक्रमकता कायम ठेवायला हवी होती. याचा फायदा बोलेरतुयाने उचलत पट काढण्याचा प्रयत्न सुरू केला व त्यात ती यशस्वी झाली. पट काढून सोनमवर घेतलेले दोन गुण तिच्या दृष्टीने फार महत्त्वाचे ठरले. कारण नियमानुसार समान गुण असताना एकत्रित गुणाची पकड महत्त्वाची ठरते. अखेरच्या २५ सेकंदांमध्ये गुणांची ही बरोबरी तोडण्यात सोनम अयशस्वी ठरली.

आजच्या लढती कशा असतील
८६ किलो वजनगटात लढणारा दीपक पुनिया ऑलिंपक पदकाचा प्रबळ दावेदार म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जागतिक कॅडेट, जागतिक ज्युनिअर, २३ वर्षांखालील जागतिक स्पर्धा आणि वरिष्ठ जागतिक स्पर्धा अशा प्रत्येक स्पर्धेत पदक मिळवून कामगिरीमध्ये सातत्य राखलेला दीपक निश्‍चित ऑलिंपिक पदकाचा प्रबळ दावेदार आहे. त्यातच जागतिक क्रमवारीत स्थान असल्यामुळे भाग्यपत्रिकेमध्ये सीडिंग मिळणार. 


​ ​

संबंधित बातम्या