केंद्राची 22 क्रीडा महासंघांना संलग्नता?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

क्रीडासंहितेचे पूर्ण पालन केलेले नसतानाही तलवारबाजी संघटनेस संलग्नता देण्यात आली आहे. त्याचबरोबर पेनाक सिलात, सॉफ्ट टेनिस, मलखांब, आट्यापाट्या आणि बेसबॉललाही मान्यता दिली आहे. गेल्या आठवड्यात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्यामुळे कुस्ती तसेच वेटलिफ्टिंग महासंघासही मान्यता मिळाली आहे. 

नवी दिल्ली :  देशातील राष्ट्रीय क्रीडा महासंघांना संलग्नता देण्यास केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सुरुवात केली असल्याचे समजते. त्यानुसार हॉकी, जलतरण, सायकलिंग, वुशू, ज्यूदोसह 22 क्रीडा महासंघांना पहिल्या टप्प्यात संलग्नता देण्याचे ठरवले असल्याचे सूत्रांनी सांगितले. दिल्ली उच्च न्यायालयाने देशातील 54 क्रीडा महासंघाची संलग्नता रद्द केली आहे. त्यामुळे महासंघाना राष्ट्रीय शिबिरे तसेच स्पर्धा घेण्याबाबत प्रश्न येत आहेत. काही आठवड्यांपूर्वी क्रीडा महासंघांची संलग्नता हा पूर्णपणे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा निर्णय आहे, असे सरकारतर्फे सांगण्यात आले होते.

ए बी डिव्हिल्यर्स सुपरमॅन : विराट

आता 22 क्रीडा महासंघांना संलग्नता देत असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात सादर कले असल्याचे सूत्रांनी सांगितले.बॉक्‍सिंग, ॲथलेटिक्‍स आणि फुटबॉलच्या महासंघांना संलग्नता देताना क्रीडा मंत्रालयाने अट घातली आहे. त्यांना 31 डिसेंबरपर्यंत संलग्नता दिली आहे.त्यांना तोपर्यंत क्रीडा आचारसंहितेनुसार निवडणूक घेऊन पदाधिकाऱ्यांची निवड करण्याची सूचना केली आहे. या तीनही क्रीडा महासंघांनी कोरोनामुळे वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली नाही. 

IPL2020 : 'येलोमय' घराची अनटोल्ड स्टोरी; चेन्नईच्या चाहत्याने घराला दिले धोनीचे नाव

क्रीडासंहितेचे पूर्ण पालन केलेले नसतानाही तलवारबाजी संघटनेस संलग्नता देण्यात आली आहे. त्याचबरोबर पेनाक सिलात, सॉफ्ट टेनिस, मलखांब, आट्यापाट्या आणि बेसबॉललाही मान्यता दिली आहे. गेल्या आठवड्यात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्यामुळे कुस्ती तसेच वेटलिफ्टिंग महासंघासही मान्यता मिळाली आहे. 
 
​ ​

संबंधित बातम्या