नेमबाजांची मोहीम पदकांविनाच संपली

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 August 2021

ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर आणि संजीव राजपूत यांना ऑलिंपिक नेमबाजी स्पर्धेतील ५० मीटर रायफल थ्री पोझीशनमध्ये अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले आणि भारतीय नेमबाजांची ऑलिंपिक स्पर्धेतील मोहीम पदकाविनाच संपली.

टोकियो/ मुंबई - ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर आणि संजीव राजपूत यांना ऑलिंपिक नेमबाजी स्पर्धेतील ५० मीटर रायफल थ्री पोझीशनमध्ये अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले आणि भारतीय नेमबाजांची ऑलिंपिक स्पर्धेतील मोहीम पदकाविनाच संपली.

प्राथमिक फेरीत ऐश्वर्य २१ वा; तर संजीव ३२ वा आला, त्यामुळे सलग दुसऱ्या स्पर्धेत भारतीय नेमबाज पदकांचा वेध घेण्याची अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले. प्रत्येक स्पर्धेत अव्वल आठ नेमबाज अंतिम फेरीस पात्र ठरतात. सौरभ चौधरी सोडल्यास कोणालाही हे साधले नाही. ऐश्वर्य तसेच संजीव हे अन्य भारतीय स्पर्धकांप्रमाणे आघाडीच्या नेमबाजांपासूनच दूर राहिले.

ऐश्वर्यने ११६७ गुणांचा वेध घेताना ६३ वेळा अचूकता साधली. त्याने प्रोनमध्ये ३९१, स्टँडिंगमध्ये ३७९ आणि नीलिंगमध्ये ३८८ गुण मिळविले होते. 

संजीवने ११५७ गुण मिळवताना ५५ वेळा १० गुणांचा अचूक वेध साधला होता. त्याची कामगिरी ३९३, ३७७, ३८७ अशी होती. अंतिम फेरी गाठलेल्या नेमबाजातील किमान गुण ११७६ होते.


​ ​

संबंधित बातम्या