नेमबाजांच्या शिबिरास आता 15 चा मुहूर्त 

संजय घारपुरे
Friday, 9 October 2020

सातत्याने लांबणीवर टाकले जात असलेले नेमबाजी शिबिर आता 15 ऑक्‍टोबर ते 14 डिसेंबरदरम्यान होईल, असे क्रीडा प्राधिकरणाने सांगितले आहे.

नवी दिल्ली : सातत्याने लांबणीवर टाकले जात असलेले नेमबाजी शिबिर आता 15 ऑक्‍टोबर ते 14 डिसेंबरदरम्यान होईल, असे क्रीडा प्राधिकरणाने सांगितले आहे. हे शिबिर केवळ ऑलिंपिकमध्ये खेळण्याची शक्‍यता असलेल्या नेमबाजांसाठीच आहे. 

टी -20 क्रिकेटबाबत गावस्करांनी सुचवला पर्याय ; गोलंदाजांवरील दबाव कमी होणार? 

राष्ट्रीय शिबिर यापूर्वी दोनदा लांबणीवर टाकण्यात आले आहे. कोरोनाचे रुग्ण सतत वाढत असल्याने, तसेच सध्याच्या परिस्थितीत प्रवास धोकादायक असल्याचे नेमबाज सांगत होते. मात्र आता क्रीडा प्राधिकरणाने या शिबिराची थेट घोषणाच केली आहे. या शिबिरात 18 पुरुष आणि 14 महिना नेमबाजांसह आठ भारतीय, तीन परदेशी मार्गदर्शक असतील. तसेच दोन सपोर्ट स्टाफ असतील. या शिबिरासाठी क्रीडा प्राधिकरणाने 1 कोटी 43 लाखांची तरतूद केली आहे. 

धोनीनंतर आता मुथय्या मुरलीधरनचा येणार बायोपिक ; साऊथचा अभिनेता साकारणार भूमिका 

ऑलिंपिकच्या पूर्वतयारीसाठी हे शिबिर आवश्‍यक आहे. प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हे शिबिर होईल. नेमबाज घरी सराव करीत होते, पण त्यांनी ऑलिंपिकसाठी एकत्रित सराव करणे आवश्‍यक आहे, असे भारतीय नेमबाजी संघटनेचे अध्यक्ष रनिंदर सिंग यांनी सांगितले. भारताचे विक्रमी 15 नेमबाज ऑलिंपिकसाठी पात्र ठरले आहेत.


​ ​

संबंधित बातम्या