विमानातून जाण्यासाठी लाच द्यायची? पिस्तुलासह प्रवेश नाकारल्यावर मनूची विचारणा
मनूकडे पिस्तूल नेण्याची परवानगी असणारे पत्र होते; पण त्यानंतरही विमानतळावरील आधिकाऱ्यांनी 5 हजार 200 देण्यास सांगितले; पण काही वेळात हीच रक्कम दोन पिस्तूल असल्याने 10 हजार 400 केली.
मुंबई : सरावासाठी दिल्लीहून भोपाळला जाणाऱ्या मनू भाकरला एअर इंडियाने शस्त्र नेण्यास परवानगी न दिल्याने, त्याचबरोबर त्यासाठी पैसे मागितल्याने मनू चिडली आणि तिने पिस्तूल नेण्यासाठी लाच द्यायची का, अशी विचारणा करणारे ट्विट केले. मनूकडे पिस्तूल नेण्याची परवानगी असणारे पत्र होते; पण त्यानंतरही विमानतळावरील आधिकाऱ्यांनी 5 हजार 200 देण्यास सांगितले; पण काही वेळात हीच रक्कम दोन पिस्तूल असल्याने 10 हजार 400 केली.
IPL Auction 2021 : अनसोल्ड राहिल्यावर गर्लफ्रेंडनं केलं ट्रोल; ICCने केली मध्यस्थी
ही अतिरिक्त रक्कम का, अशी विचारणा मनूने केल्यानंतर प्रश्न निर्माण झाला, असे तिचे वडील रामकिशन भाकर यांनी सांगितले. विमानाची वेळ नजीक आल्यावरही काही होत नसल्याने मनूने चिडून ट्विट केले होते, असेही ते म्हणाले. पण मनूच्या ट्विटनंतर क्रीडा मंत्रालय तसेच नेमबाजी संघटनेने सर्व औपचारिकता वेगाने पूर्ण केली. दरम्यान, दिल्लीतील काही आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मनूकडे सर्व कागदपत्रे नसल्याने हे प्रकरण वाढले होते. तिच्या ट्विटनंतर एअर इंडियाने आम्ही दिल्ली विमानतळास कळवत आहोत, काही मिनिटे द्या, असे ट्विट केले; मात्र या दरम्यान मनूचे ट्विट व्हायरल झाले होते.
Thank you @KirenRijiju sir. Got boarded after strong support from all of you.
Thank you India. jai hind— Manu Bhaker (@realmanubhaker) February 19, 2021