कमलप्रीतची लिंगचाचणी करण्याची मागणी सीमाने केली

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 July 2021

ऑलिंपिक क्रीडा ॲथलेटिक्स स्पर्धेतील महिलांच्या थाळीफेकीसाठी सीमा अंतील तसेच कमलप्रीत कौर पात्र ठरल्या आहेत. आता कमलप्रीतची लिंगचाचणी करण्याची मागणी सीमाने भारतीय ॲथलेटिक्स महासंघाकडे केली आहे.

नवी दिल्ली - ऑलिंपिक क्रीडा ॲथलेटिक्स स्पर्धेतील महिलांच्या थाळीफेकीसाठी सीमा अंतील तसेच कमलप्रीत कौर पात्र ठरल्या आहेत. आता कमलप्रीतची लिंगचाचणी करण्याची मागणी सीमाने भारतीय ॲथलेटिक्स महासंघाकडे केली आहे.

कमलप्रीतची हायपरँद्रोगेनिझम चाचणी करण्यासाठी सीमा आग्रही आहे. या चाचणीत महिलेच्या नियमित टेस्टोस्टेरॉनपेक्षा जास्त असल्यास ते आढळून येते. जागतिक अॅथलेटिक्स महासंघाने याबाबत नियम केले आहेत, पण त्यात फिल्ड स्पर्धांचा (थाळीफेक, भालाफेक, हातोडा फेक, लांब उडी, उंच उडी, तिहेरी) समावेश नसतो.

कमलप्रीतने मार्चमध्ये ऑलिंपिक पात्रता गाठताना ६५.०६ मीटर कामगिरी केली होती. त्यात तिने जूनमध्ये सुधारणा करीत ६६.५६ मीटर अशी कामगिरी केली. या वर्षापूर्वी तिची सर्वोत्तम कामगिरी ६१.०४ मीटर होती. कमलप्रीतच्या कामगिरीत चार वर्षांत १४ मीटरपर्यंत सुधारणा झाली आहे. हे धक्कादायक आहे, याकडे सीमाने लक्ष वेधले आहे.


​ ​

संबंधित बातम्या