नव्या पोषाख पुरस्कर्त्यांचा शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 June 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय पथकाच्या पोषाखाचे नवे पुरस्कर्ते शोधण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघटना प्रयत्नशील आहे; पण त्यासाठी कोणावरही दडपण आणणार नाही, असे भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी सांगितले.

नवी दिल्ली - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय पथकाच्या पोषाखाचे नवे पुरस्कर्ते शोधण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघटना प्रयत्नशील आहे; पण त्यासाठी कोणावरही दडपण आणणार नाही, असे भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी सांगितले.

ली निंग या चीनमधील कंपनीने भारतीय खेळाडूंसाठी डिझाईन केलेल्या पोषाखाचे अनावरण केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांच्या उपस्थितीत झाले होते. त्या वेळी भारतीय संघासाठी चीनची कंपनी पुरस्कृत कशी, अशी विचारणा झाली होती. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या वेळी खेळाडूंना याच प्रश्नाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन तसेच देशवासीयांच्या भावना लक्षात घेऊन पुरस्कार रद्द करण्यात आला.


​ ​

संबंधित बातम्या