NBA मध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू डोपिंग मध्ये दोषी  

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 24 December 2020

अमेरिकन बास्केटबॉल लीग अर्थात एनबीएच्या संघात प्रवेश करणारा पहिला भारतीय खेळाडू सतनाम सिंग भामरा याच्यावर दोन वर्षासाठी बंदी घालण्यात आली

अमेरिकन बास्केटबॉल लीग अर्थात एनबीएच्या संघात प्रवेश करणारा पहिला भारतीय खेळाडू सतनाम सिंग भामरा याच्यावर दोन वर्षासाठी बंदी घालण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात सतनाम सिंग भामरा डोपिंग चाचणीत करण्यात अयशस्वी ठरला होता. त्याच्यानंतर राष्ट्रीय अँटी-डोपिंग एजन्सीने (नाडा) त्याच्यावर कारवाई करत तात्पुरते निलंबित केले होते. सतनाम सिंग भामरावर लावण्यात आलेली बंदी 19 नोव्हेंबर 2019 पासून असणार आहे. व ही बंदी 18 नोव्हेंबर 2021 पर्यंत असेल. त्यामुळे त्याला इतर कोणत्याही स्पर्धेत भाग घेता येणार नाही. 

ऑस्ट्रेलियन ओपन 2021: रॉजर फेडररसह दिग्गज टेनिसपटू उतरणार मैदानात 

सतनाम सिंग भामराला 2015 मध्ये एनबीएतील डल्लास मॅवेरिक्स आपल्या संघात सहभागी केले होते. त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी बंगळुरू येथे घेण्यात आलेल्या कॅम्पच्या वेळेस नाडाने त्याची डोपिंग टेस्ट घेतली होती. ज्यात तो अयशस्वी झाला होता. व सुरवातीला त्याने सर्व आरोप फेटाळून लावले होते. मात्र त्यानंतर आपल्यावरील आरोप मान्य केले होते. तर वैयक्तिक कारणामुळे तेराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेतून सतनाम सिंग भामराने माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. 

LOOK BACK 2020: क्रिडा विश्वातील 'या' दिग्गज खेळाडूंनी घेतला जगाचा...

नाडाच्या नियमानुसार एखादा खेळाडूची चाचणी नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसाच्या आत ब चाचणी करण्यात येते. आणि चाचणीत देखील खेळाडूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह राहिल्यास मग पुढील सुनवाई नाडाच्या अँटी-डोपिंग शिस्त समितीसमोर करण्यात येते. व खेळाडूवर आरोप निश्चित करून शिक्षा देखील याच समितीकडून देण्यात येते.       

 


​ ​

संबंधित बातम्या