भारतीय क्रीडापटूंना ऑलिंपिक स्पर्धेपूर्वी सरावाची संधी देण्याबाबत फेरविचार करण्याची तयारी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 June 2021

भारतीय क्रीडापटूंना ऑलिंपिक स्पर्धेपूर्वी सरावाची संधी देण्याबाबत फेरविचार करण्याची संयोजन समितीने तयारी दाखवली आहे. भारतीयांसाठी कठोर प्रतिबंधक उपाय केल्यानंतर भारतीय ऑलिंपिक संघटनेने याबाबत आक्षेप घेतला होता.

नवी दिल्ली - भारतीय क्रीडापटूंना ऑलिंपिक स्पर्धेपूर्वी सरावाची संधी देण्याबाबत फेरविचार करण्याची संयोजन समितीने तयारी दाखवली आहे. भारतीयांसाठी कठोर प्रतिबंधक उपाय केल्यानंतर भारतीय ऑलिंपिक संघटनेने याबाबत आक्षेप घेतला होता. 

ऑलिंपिकला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना प्रयाणापूर्वी भारतात सात दिवस कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे, तसेच जपानमध्ये दाखल झाल्यावर तीन दिवस अन्य देशांच्या खेळाडूंसह बोलण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याचे कळवण्यात आले होते. भारतात कोरोनाचा नवा विषाणू आढळल्याचे सांगत हा निर्णय झाल्याचे कळवण्यात आले होते. कोरोना प्रतिबंधक उपायांचा खेळाडूंच्या पूर्वतयारीवर परिणाम नको, असे भारतीय संघटनेने कळवले होते.

भारतीय क्रीडापटू, तसेच अन्य देशातील खेळाडूंच्या सुरक्षित मुक्कामाची तसेच सरावाबाबत आम्ही विचार करीत आहोत. याबाबत लवकरच संपूर्ण माहिती कळवण्यात येईल. त्यासंदर्भात एकत्रितपणे चर्चाही होईल, असे संयोजकांनी कळवले आहे.  संयोजकांनी यापूर्वी नियमावली तयार करताना गट क्रमांक एकमधील देशातील खेळाडू जपानमधील आगमनापूर्वी सहा दिवस रोज चाचणी करतील असे सांगितले आहे. त्या कालावधीत अन्य कोणासोबत संपर्क नको, असे कळवले आहे. गट क्रमांक एकमध्ये भारतासह, अफगाणिस्तान, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका यासह दहा देश आहेत.


​ ​

संबंधित बातम्या