पी. टी. उषाचे प्रशिक्षक नांबियार यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 August 2021

स्प्रिंट क्वीन पी. टी. उषाचे प्रशिक्षक ओएम नांबियार यांचे गुरुवारी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल पी. टी. उषासह क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

नागपूर - स्प्रिंट क्वीन पी. टी. उषाचे प्रशिक्षक ओएम नांबियार यांचे गुरुवारी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल पी. टी. उषासह क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

केरळमधील कोझीकोड जिल्ह्यातील वडकरा येथील नांबियार हे १९५५ ते ७० या काळात भारतीय वायूसेनेत कार्यरत होते. या काळात त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत सेनादलाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर त्यांनी पतियाळा येथील नेताजी सुभाष राष्ट्रीय प्रशिक्षण संस्थेतून पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. काही काळ सेनादलाच्या खेळाडूंना प्रशिक्षण दिल्यानंतर ते केरला स्पोर्टस कौन्सिलमध्ये रुजू झाले. याच वेळी तिरुवनंतपुरम येथे एका निवड चाचणीदरम्यान त्यांनी उषाची निवड केली होती. त्यानंतर ८० व ९० च्या दशकात त्यांनी उषाला प्रशिक्षण दिले.

१९८४ च्या ऑलिंपिकच्या वेळी उषाने चारशे मीटर हर्डल्स शर्यतीत चौथे स्थान मिळवले त्या वेळी ते उषाचे प्रशिक्षक होते. याबद्दल १९८५ मध्ये त्यांना द्रोणाचार्य पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. २०२१ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.


​ ​

संबंधित बातम्या