ताकदवान ठोसे देत पूजाची आगेकूच

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 July 2021

मार लग जाएगी, असे सांगत पूजा राणीला तिचे वडील बॉक्सिंगच्या रिंगपासून दूर ठेवण्याचा काही वर्षांपूर्वी प्रयत्न करीत होते. त्याच पूजा राणीने ताकदवान ठोसे देत अल्जेरियाच्या चाईब हिला पराजित करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

टोकियो - मार लग जाएगी, असे सांगत पूजा राणीला तिचे वडील बॉक्सिंगच्या रिंगपासून दूर ठेवण्याचा काही वर्षांपूर्वी प्रयत्न करीत होते. त्याच पूजा राणीने ताकदवान ठोसे देत अल्जेरियाच्या चाईब हिला पराजित करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

पूजाने तिच्या दहा वर्षांनी लहान असलेल्या प्रतिस्पर्धीविरुद्ध एकतर्फी वर्चस्व राखत ५-० (३०-२६, ३०-२७, ३०-२७, ३०-२७, ३०-२७) असा कौल मिळविला. दोन वेळच्या आशियाई विजेत्या पूजाने पहिल्या सेकंदापासून हुकूमत घेतली आणि तिनेही तीनही फेऱ्यात सहज वर्चस्व राखले. पाचही जजनी तीनही फेऱ्यांत पूजाच सरस असल्याचा कौल दिला. 

राणी तसेच चईब या दोघीही पहिल्यांदा ऑलिंपिक खेळत होत्या, पण राणीच्या खेळात हे जाणवत नव्हते. तिने सुरवातीपासून ताकदवान ठोसे देताना प्रतिस्पर्धीस आक्रमणाची संधी दिली नाही. काही वेळा चईबने ताकदवान आक्रमण करण्यास सुरुवात केली, पण ते रोखताना राणीने जोरदार प्रतिहल्ला करीत पंचांना प्रभावीत केले. प्रतिस्पर्धीचे ठोसेही राणीने सहज चुकविले. 

राणी या स्पर्धेत प्रभावी कामगिरी करण्यास उत्सुक आहे. जिगरबाज खेळासाठी ती प्रसिद्ध आहे. खांद्याची दुखापत, अपघाताने जळालेला हात, आर्थिक मदतीची वानवा या सर्व प्रश्नांवर तिने मात केली.


​ ​

संबंधित बातम्या