उद्‍घाटन काही तासांवर; संचालकांची हकालपट्टी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 July 2021

एकीकडे कोरोनाच्या संकटाची टांगती तलवार डोक्यावर असताना आणि त्यातूनही स्पर्धा आयोजनाचे शिवधनुष्य पेलण्याची हिम्मत दाखवत असताना टोकियो ऑलिंपिक संयोजन समितीने नितीमूल्यांशी तडजोड केली नाही.

१९९० मध्ये केलेले भाष्य आले मुळावर
टोकियो - एकीकडे कोरोनाच्या संकटाची टांगती तलवार डोक्यावर असताना आणि त्यातूनही स्पर्धा आयोजनाचे शिवधनुष्य पेलण्याची हिम्मत दाखवत असताना टोकियो ऑलिंपिक संयोजन समितीने नितीमूल्यांशी तडजोड केली नाही. काही तासांवर उद्‍घाटन सोहळा आलेला असताना या सोहळ्याच्या संचालकांची एका फार जुन्या प्रकरणावरून हकालपट्टी करण्याचे धाडस त्यांनी केले.

केंतारो कोबायाशी हे या उद्‍घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे संचालक होते. १९९० मध्ये टीव्ही कार्यक्रमातील एका विनोदी स्कीटमध्ये सेमिटीक भाषा बोलणाऱ्यांची खिल्ली उडवणारे भाष्य त्यांनी केले होते. त्या कार्यक्रमाचा व्हिडीओ नुकताच चर्चेत आला आणि संयोजन समितीने कोबायाशी यांची हकालपट्टी केली.

हा ‘इतिहास'' फारच वेदनादायी आहे, असे ऑलिंपिक स्पर्धा आयोजनाचे प्रमुख सेकिओ हाशिमोटो सांगितले. 

हकालपट्टीचा प्रसंग

  • शाळेतील आपल्या अपंग वर्गमित्राला धमकावल्यामुळे उद्‍घाटन सोहळ्यातील संगीतकाराची हकालपट्टी. गेल्या आठवड्यातील ही घटना.
  • उद्‍घाटन सोहळ्याचे निर्मिती प्रमुख हिरोश सासाकी यांनी विनोदी कलाकार नावोमी वतानाबे यांच्या स्थूलतेवरून ‘ऑलिंपिंग'' म्हणून हिणवले, त्यानंतर लगेचच दिलगिरी व्यक्त केली असली तरी त्यांना राजीमाना द्यावा लागला. 
  • संघटन समितीचे पमुख याशिरो मुली यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले, त्यानंतर त्यानीही दिलगीरी व्यक्त केली, परंतु त्यांचीही हकलापट्टी करण्यात आली.

​ ​

संबंधित बातम्या