ऑलिंपिक ज्योत प्रवासात कोरोनाचा अडथळा?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 April 2021

ओसाकात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे ज्योतीने ओसाकात प्रवेश करू नये, अशी विनंती ओसाकाचे महापौर तसेच तेथील राज्यपालांनी केली आहे. 

टोकियो : ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा होणारच, हे जगाला सांगण्यासाठी जपानने ऑलिंपिक ज्योतीच्या जपानमधील प्रवासाला सुरवात केली; पण या प्रवासात आता कोरोनाचा अडथळा येणार, अशी चिन्हे दिसत आहेत. ऑलिंपिक ज्योत 14 एप्रिलला ओसाका या जपानमधील प्रमुख शहरात येणार आहे; पण ओसाकात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे ज्योतीने ओसाकात प्रवेश करू नये, अशी विनंती ओसाकाचे महापौर तसेच तेथील राज्यपालांनी केली आहे. 

कोरोनाचे वाढते रुग्ण असलेल्या शहरातून तसेच परिसरातून ज्योतीचा प्रवास टाळण्यात येईल, असे संकेत संयोजकांनी दिले होते. आता याबाबतचा निर्णय ज्योतीचा  प्रवास सुरू झाल्यावर एका आठवड्यात घेणे भाग पडणार, असेच दिसत आहे. ऑलिंपिक ज्योतीचा प्रवास सुरळीतपणे करून जपानमधील ऑलिंपिकला असलेला विरोध कमी करण्याचाही प्रयत्न आहे. 

IPL 2021 : MI षटकार मारणार; CSK तळालाच राहणार; दिग्गजाने केली भविष्यवाणी

संयोजकांसमोरील प्रश्न वाढतच आहेत. त्यांनी गेल्या आठवड्यात परदेशी प्रेक्षकांना प्रवेश नाकारला होता. त्याच वेळी जपानमधील चाहत्यांच्या उपस्थितीबाबत आठ दिवसात निर्णय होईल, असे सांगितले होते. मात्र हा निर्णय अजून दोन आठवडे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. ऑलिंपिक लांबल्यामुळे संयोजकांसमोरील आर्थिक आव्हान अवघड झाले आहे. तिकीटविक्रीतून 80 कोटी डॉलर उत्पन्न अपेक्षित होते. चाहत्यांवर मर्यादा आल्यास हे लक्ष्य गाठणे अशक्य होईल.
 


​ ​

संबंधित बातम्या