टोकियोतील कठोर निर्बंधांचा ऑलिंपिक टॉर्च रिलेस फटका?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 June 2021

कोरोना महामारी नियंत्रणात आणण्यासाठी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा होणाऱ्या टोकियोतील आणीबाणी उठवण्यात आली असली, तरी त्यासदृश परिस्थिती आहे. त्यामुळे टोकियोतील ऑलिंपिक टॉर्च रिलेचा सुरुवातीचा टप्पा तरी बंद दरवाजाआड होण्याची चिन्हे आहेत.

टोकियो - कोरोना महामारी नियंत्रणात आणण्यासाठी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा होणाऱ्या टोकियोतील आणीबाणी उठवण्यात आली असली, तरी त्यासदृश परिस्थिती आहे. त्यामुळे टोकियोतील ऑलिंपिक टॉर्च रिलेचा सुरुवातीचा टप्पा तरी बंद दरवाजाआड होण्याची चिन्हे आहेत.

प्रत्येक वर्षी ऑलिंपिक टॉर्च रिलेद्वारे संयोजक यजमान शहरात स्पर्धेचे वातावरण निर्माण करतात. क्रीडाजगताचे टोकियोतील ऑलिंपिक टॉर्च प्रवासाकडे लक्ष आहे. ही ज्योत ११ जुलैस टोकियोत दाखल होईल. ती १७ जुलैपर्यंत शहराच्या उपनगरात तसेच परिसरातील बेटांवर फिरणार असे ठरले आहे; मात्र कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर असलेल्या उपनगरात ही ज्योत जाणार नाही.


​ ​

संबंधित बातम्या