दुसरा दिवसही भारताच्या महिला शक्तीचा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 July 2021

टोकियो ऑलिंपिक पुरुष-महिला समानतेचाही संदेश देणारी आहे. मीराबाई चानूने टोकियो ऑलिंपिकच्या पहिल्याच दिवशी भारताच्या रौप्य पदकाचा झेंडा अभिमानाने रोवून भारतीय स्त्री शक्तीची ताकद दाखविली.

सिंधूचा बॅडमिंटनमध्ये, मेरी कोमचा बॉक्सिंगमध्ये, तर मनिकाचा टेटेमध्ये विजय
टोकियो - टोकियो ऑलिंपिक पुरुष-महिला समानतेचाही संदेश देणारी आहे. मीराबाई चानूने टोकियो ऑलिंपिकच्या पहिल्याच दिवशी भारताच्या रौप्य पदकाचा झेंडा अभिमानाने रोवून भारतीय स्त्री शक्तीची ताकद दाखविली. 

आजच्या दुसऱ्या दिवशी भारताला कोणतेही पदक मिळाले नसले तरी महिला खेळाडूंची त्यांच्या त्यांच्या खेळातील कामगिरी लक्षवेधक ठरली आहे. गत स्पर्धेतील रौप्य विजेत्या पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटनच्या सलामीला शानदार विजय मिळविला. सहा वेळच्या विश्वविजेत्या मेरी कोमनेही दणकेबाज सलामी दिली, तर टेबल टेनिसमध्ये पहिले दोन गेम गमाविलेले असतानाही मनिका बात्राने जागतिक क्रमवारीत ३२ व्या स्थानावर असलेल्या खेळाडूविरुद्ध धक्कादायक विजय मिळविला. एकीकडे या अनुभवी खेळाडू मार्गक्रमण करत असताना हरहुन्नरी नेमबाज मनू भाकरची पिस्तूल प्राथमिक फेरीत महत्त्वाच्या क्षणी नादुरुस्त झाली. तरीही तिने हार मानली नाही. पिस्तूल रिपेअर करून ती लढली, पण तिचा लढा थोडक्यात कमी पडला.


​ ​

संबंधित बातम्या