ढोल-ताशांच्या गजरात ऑलिंपिकवीरांचे स्वागत

पीटीआय
Tuesday, 10 August 2021

भारतीय क्रीडा क्षेत्राचा नवा हिरो याच्यासह ऑलिंपिकमधील काही पदकवीरांचे आज मायदेशात आगमन झाले. विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरातले हे स्वागत रोमांच उभे करणारे असले, तरी विमानतळावर या खेळाडूंचे स्वागत करताना कोरोना नियमांना हरताळ फासण्यात आला.

नवी दिल्ली - भारतीय क्रीडा क्षेत्राचा नवा हिरो याच्यासह ऑलिंपिकमधील काही पदकवीरांचे आज मायदेशात आगमन झाले. विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरातले हे स्वागत रोमांच उभे करणारे असले, तरी विमानतळावर या खेळाडूंचे स्वागत करताना कोरोना नियमांना हरताळ फासण्यात आला.

खेळाडूंच्या स्वागतासाठी त्यांचे कुटूंबीय, मित्र विमातळावर उपस्थित होते, पण विमानतळावर इतर लोकांकडूनच खेळाडूंना गराडा घालण्यात आला होता. त्यात काही राजकारण्यांचाही समावेश होता. विमानतळावर आणि विमानतळाच्या बाहेरही फारच मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

विमानतळाच्या बाहेर जोरजोरात ढोल-ताशांचा आवाज घुमत होता. काही जण नाच-गाणीही करत होते; मात्र अशा वातावरणात विमातळातून बाहेर येताना खेळाडूंना मोठी कसरत करावी लागत होती. कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी आवश्यक असलेले सुरक्षित अंतर कोणाकडूनही पाळले जात नव्हते. अनेकांच्या तोंडावर मास्कही नव्हते.

नीरज चोप्रा आकर्षण
टोकियो ऑलिंपिकची सांगता सुवर्णपदकाने करणारा नीरज चोप्रा सर्वांचे आकर्षण होता. त्याच्या जवळ जाण्यासाठी सर्वांची धडपड होती. सुरक्षा रक्षकांनी गराडा केला असला तरी काही जण नीरजपर्यंत जात होते. धक्काबुक्कीचेही प्रकार होत होते. आम्ही येथे आमच्या हिरोंना शाबासकी देण्यासाठी आलो आहोत आम्हाला त्यांचा अभिमान आहे, असे अनेक जण सांगत होते.

विमानातून बाहेर येतात विमानतळाच्या स्टाफने बुके देऊन सर्व ऑलिंपिकवीरांचे स्वागत केले; मात्र त्यानंतर मात्र गोंधळ होत गेला.

अशा प्रकारचे स्वागत मी प्रथमच पाहत आहे, असे मत के. टी. इरफानने व्यक्त केले. इरफान २० कि.मी. चालण्याच्या शर्यतीत सहभागी झाला होता. भारताची ही टोकियो ऑलिंपिक मोहीम आतापर्यंत सर्वाधिक सात पदके मिळवून देणारी ठरली. 

देशासाठी ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकू शकलो याचा फारच मोठा अभिमान आहे. केवळ माझेच असे स्वागत करू नका, इतर खेळाडूही तेवढ्याच स्वागताचे मानकरी आहेत. आम्हा सर्वांवर असलेले प्रेम कायम असू द्या. यापुढेही अधिक चांगली कामगिरी आम्ही करत राहू.
- नीरज चोप्रा


​ ​

संबंधित बातम्या