ऑलिंपिक ते हॉकीपटू रवींदरपाल यांचे निधन

पीटीआय
Sunday, 9 May 2021

भारताचे माजी हॉकी खेळाडू  आणि १९८० च्या मॉस्को ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या संघातील खेळाडू रवींदरपाल सिंग (वय ६०) यांचे शनिवारी लखनौमध्ये कोरोनामुळे निधन झाले. दोन आठवडे ते कोरोनाशी लढत होते.

नवी दिल्ली - भारताचे माजी हॉकी खेळाडू  आणि १९८० च्या मॉस्को ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या संघातील खेळाडू रवींदरपाल सिंग (वय ६०) यांचे शनिवारी लखनौमध्ये कोरोनामुळे निधन झाले. दोन आठवडे ते कोरोनाशी लढत होते.

कोरोनाचा संकर्ग झाल्याचे निदान झाल्यानंतर रवींदरपाल सिंग यांना लखनौमधील रुग्णालयात २४ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार रवींदरपाल या आजारातून बरेही झाले होते, गुरुवारी चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना कोविड नसलेल्या वॉर्डमध्ये हलवण्यातही आले होते, परंतु शुक्रवारी त्यांची प्रकृती अचानक ढासळत गेली. व्हेंटिलेटवर त्यांना ठेवावे लागले होते.

१९८४ च्या लॉस एंजलिस ऑलिंपिकमध्येही ते सहभागी झाले होते. त्यांनी लग्न केले नव्हते. १९७९ च्या ज्युनियर विश्वकरंडक हॉकी स्पर्धेतून त्यांनी मोठी झेप घेण्यास सुरुवात केली होती.

सितापूर येथे जन्म झालेले रावींदरपाल सिंग उत्तम मध्य रक्षक होते. १९७९ ते १९८४ हा काळ त्यांनी गाजवला होता. दोन विश्वकरंडक हॉकी स्पर्धेसह त्यांनी कराचीत झालेल्या (१९८०, १९८३) चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. १९८३ मध्ये हॉँगकाँगमध्ये झालेल्या स्पर्धेसह मुंबईत १९८२ मध्ये झालेल्या विश्वकरंडक आणि कराचीत याच वर्षी झालेल्या आशिया करंडक स्पर्धेतही त्यांनी ठसा उमटवला होता.


​ ​

संबंधित बातम्या