शस्त्र परवाना रद्द करण्याबाबत सुशील कुमारला नोटीस

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 June 2021

नवोदित कुस्तीगीर सागर धनकड याच्या खुनाचा आरोप असलेला सुशील कुमार याचा शस्त्र परवाना तहकूब करण्यात आला आहे. त्याच वेळी हा परवाना रद्द का करू नये ही नोटीस बजावली असल्याचे सूत्रानी सांगितले.

नवी दिल्ली - नवोदित कुस्तीगीर सागर धनकड याच्या खुनाचा आरोप असलेला सुशील कुमार याचा शस्त्र परवाना तहकूब करण्यात आला आहे. त्याच वेळी हा परवाना रद्द का करू नये ही नोटीस बजावली असल्याचे सूत्रानी सांगितले.

शस्त्र परवाना रद्द करण्याबाबतची नोटीस सुशीलच्या घरी पाठवण्यात आली आहे. त्याला यास उत्तर देण्यासाठी १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सागरच्या खुनाचा आरोप असलेल्या सुशीलला दिल्ली पोलिसांनी घटनेनंतर २० दिवसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, सागरचा खून झाला त्या वेळी सुशीलने घातलेले कपडे तसेच त्या वेळी त्याच्याकडे असलेला फोन अद्याप तपास पथकास मिळालेला नाही. त्यामुळे फरार असताना सुशीलला ज्यांनी मदत केली त्यांची चौकशीही सुरू आहे.


​ ​

संबंधित बातम्या