नीरजच्या सुवर्ण यशाची झाली जगात चर्चा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 August 2021

निष्णात अशा प्रतिस्पर्ध्यांना जवळपासही फिरकू न देता टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणारा केवळ भारतीयांसाठीच हिरो ठरला नाही, तर ट्विटरमध्ये तो जगात तिसऱ्या क्रमांकावर होता.

नवी दिल्ली - निष्णात अशा प्रतिस्पर्ध्यांना जवळपासही फिरकू न देता टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणारा केवळ भारतीयांसाठीच हिरो ठरला नाही, तर ट्विटरमध्ये तो जगात तिसऱ्या क्रमांकावर होता. भारतातील ट्विटर ट्रेंडमध्ये हॉकीची सर्वाधिक चर्चा होती. २०१६ च्या रिओ ऑलिंपिकच्या तुलनेत हा ट्विटर ट्रेंड १३४ टक्यांनी वाढला होता.

टोकियो ऑलिंपिक समारोपाच्या आदल्या दिवशी भारतीयांचे लक्ष नीरज चोप्राकडे लागले होते, परंतु भालाफेकीच्या अंतिम सामन्यात त्याने केलेल्या कामगिरीची दखल विश्वात घेतली गेली. ऑलिंपिकच्या अधिकृत हँडलवरून नीरजच्या भालाफेकीचे व्हिडीओ सर्वाधिक व्हायरल झाले. त्याच्या या सवर्ण क्षणाचे व्हिडीओ सर्वाधिक रिट्विट झाले होते. प्रतिक्रियांचाही पूर आला होता.

अजूनही मी सुवर्णक्षणाचा मार्ग अनुभवत आहे. भारतीयांनी मला दिलेला पाठिंबा आणि आशीर्वाद याचे  शब्दांत वर्णन करणे अशक्य आहे, असे ट्विट नीरजने केले होते. त्यावर शुभेच्छांचा पाऊस पडला होता.


​ ​

संबंधित बातम्या