नीरज क्रमवारीत दुसरा; फॉलोअर्समध्ये पहिला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 August 2021

टोकियो ऑलिंपिकमध्ये तमाम भारतीयांना सुवर्णपदकाचा अत्युच्य आनंद मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्राने भालाफेकीच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे; तर ट्रॅक आणि फिल्डमध्ये तो सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या खेळाडूही ठरला आहे.

नवी दिल्ली - टोकियो ऑलिंपिकमध्ये तमाम भारतीयांना सुवर्णपदकाचा अत्युच्य आनंद मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्राने भालाफेकीच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे; तर ट्रॅक आणि फिल्डमध्ये तो सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या खेळाडूही ठरला आहे.

भारतीयांसाठी ७ ऑगस्ट रोजी नीरजने इतिहास घडवला. ट्रॅक आणि फिल्डमध्ये ऑलिंपिकमधील पहिलेवहिले तसेच सुवर्णपदकही जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला. अंतिम फेरीत ८७.५८ इतका लांब भाला फेकून त्याने जागतिक भालाफेक क्षेत्रातही सर्वांना अचंबित केले.

जागतिक भालाफेक संघटनेने ताजी क्रमवारी जाहीर केली. त्याता जर्मनीचा जोहानेस वेट्टर १३९५ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे वेट्टर ऑलिंपिकमध्ये पहिल्याच फेरीत बाद झाला आणि या पहिल्या फेरीसह अंतिम फेरीतही नीरज पहिल्या क्रमांकावर राहिला होता. या अफलातून कामगिरीमुळे नीरजे आता १३१५ गुण झाले आहेत.

नीरजच्या या यशाने भारतीयांमध्ये भालाफेकीचे औत्युक्य वाढले. याचा फायदा जागतिक भालाफेक संघटनेलाही झाला. ऑलिंपिक स्पर्धेपूर्वी या खेळाचे बऱ्यापैकी फॉलोअर्स होते, पण नीरजने सुवर्णपदक विजेती कामगिरी केल्यानंतर कमालीचे फॉलोअर्स वाढल्याचे जागतिक भालाफेक संघटनेने म्हटले आहे.

नीरजचे सर्वाधिक फॉलोअर्स
ऑलिंपिकपूर्वी नीरजचे इंस्टाग्रमावर एक लाख ४३ हजार फॉलोअर्स होते. आता ही संख्या तीन कोटी ३० लाखांवर गेली आहे. सध्या तो जगात ट्रॅक आणि फिल्डमध्ये सर्वाधिक फॉओअर्स असलेला खेळाडू आहे.


​ ​

संबंधित बातम्या