ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी वैद्यकीय अधिकारी जगभरातून आणणार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 May 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेस जपानमधून होणारा विरोध कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती सरसावली आहे. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी आवश्यक असलेले वैद्यकीय अधिकारी जगभरातून आणण्याचा प्रस्ताव समितीचे प्रमुख थॉमस बाश यांनी दिला आहे.

ल्युसाने - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेस जपानमधून होणारा विरोध कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती सरसावली आहे. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी आवश्यक असलेले वैद्यकीय अधिकारी जगभरातून आणण्याचा प्रस्ताव समितीचे प्रमुख थॉमस बाश यांनी दिला आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती आणि संयोजन समितीतील ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेबाबतची तीन दिवसांची संयुक्त बैठक सुरू झाली. या बैठकीत ऑलिंपिक क्रीडा नगरी तसेच स्पर्धेच्या ठिकाणी आवश्यक असलेली वैद्यकीय सुविधा जगभरातील विविध देशांच्या ऑलिंपिक समिती उपलब्ध करून देऊ शकतील असे बाश यांनी सांगितले. त्यांनी ऑलिंपिकचे सुरक्षित संयोजन होईल अशी ग्वाही जपानला दिली.

जपानमध्ये आतापर्यंत अवघे दोन टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे ऑलिंपिकची ८ ऑगस्टला सांगता होईपर्यंत जपानमधील बुजुर्गांचेही लसीकरण पूर्ण झालेले नसेल. या परिस्थितीत स्पर्धा घेतल्यास त्याचा जपानमधील आरोग्य यंत्रणेवर ताण पडेल, त्यामुळे स्पर्धा रद्द करण्याची मागणी जपानमधील डॉक्टरांच्या संघटनेने केली आहे.

ऑलिंपिक समितीप्रमुख म्हणाले...

  • जगभरात क्रीडा स्पर्धांचे सुरक्षित आयोजन होत आहे
  • जपानमध्ये झालेल्या स्पर्धाही सुरळीतपणे पार पडल्या
  • ऑलिंपिक चाचणी स्पर्धांमुळे टोकियोतील कोरोना रुग्णांत वाढ झालेली नाही
  • चाचणी स्पर्धेच्या वेळी असलेल्या क्रीडापटूंची रोज चाचणी झाली.

जपानमधील डॉक्टर म्हणतात...

  • देशातील रुग्णांऐवजी ऑलिंपिकसाठी आलेल्या बाधितांना प्राधान्य देणार नाही
  • जपानमधील वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढलेला आहे
  • ऑलिंपिकसाठी १० हजार आरोग्य कर्मचारी दिले, तर जपानमधील नागरिकांवर उपचार कसे करणार

​ ​

संबंधित बातम्या