विश्वनाथसह चार बॉक्सरकडून पदक निश्चित

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 August 2021

दुबईत सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद युवा आणि ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेत विश्वनाथ सुरेशसह चार भारतीय खेळाडूंनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

नवी दिल्ली - दुबईत सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद युवा आणि ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेत विश्वनाथ सुरेशसह चार भारतीय खेळाडूंनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

वंशराज (६४ किलो), दक्ष सिंग (६७) आणि जयदीप रावत (७१) यांच्यासह विश्वनाथ सुरेश यांनी उपांत्य फेरी गाठून पदक निश्चित केले आहे. आजच्या दिवसाची सुरुवात विश्वनाथने शानदार विजयाने केली. त्याने ४८ किलोच्या 

उपांत्यपूर्व फेरीत किरगिस्तानच्या झोलब्बोरोसोव अमंतोरचा ५-० असा एकतर्फी पराभव केला. विश्वनाथच्या आक्रमक ठोशांपुढे झोलब्बोरोसोवकडे उत्तर नव्हते.

वंशराजनेही विश्वनाथप्रमाणेच एकतर्फी विजयाची नोंद केली. ताजिकिस्तानच्या मखामो दुवाद वंशराजसमोर निरुत्तर होता. जयदीपनेही दुबईच्या इसा महम्मद अलकुर्दीविरुद्ध तेवढाच ताकदवान खेळ केला. रेफ्रींनी ही लढत दुसऱ्या राउंडमध्ये थांबवली.

एकीकडे चौघे बॉक्सर्स उपांत्य फेरी गाठून पदक निश्चित करत असताना विक्टर शिखोम सिंग (५४ किलो), विजय सिंग (५७) आणि रबीचंद्र सिंग (६०) यांना मात्र उपांत्यपूर्व सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.


​ ​

संबंधित बातम्या