विक्रमी सहाव्या सुवर्णपदकाचा मेरीला गुंगारा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 31 May 2021

मेरी कोमला आशियाई बॉक्सिंग स्पर्धेतील विक्रमी सहाव्या सुवर्णपदकाने गुंगारा दिला. सहा वेळच्या जागतिक विजेत्या मेरीला ५१ किलो गटातील सुवर्णपदकाच्या अंतिम लढतीत हार पत्करावी लागली.

मुंबई - मेरी कोमला आशियाई बॉक्सिंग स्पर्धेतील विक्रमी सहाव्या सुवर्णपदकाने गुंगारा दिला. सहा वेळच्या जागतिक विजेत्या मेरीला ५१ किलो गटातील सुवर्णपदकाच्या अंतिम लढतीत हार पत्करावी लागली.

मेरीला दोन वेळा जागतिक विजेतेपद जिंकलेल्या नाजिम काजैबे हिच्याविरुद्ध २-३ अशा पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळे तिचे आशियाई स्पर्धेतील विक्रमी सहावे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मेरीची प्रतिस्पर्धी चांगलीच कडवी होती. तिने मेरीला वर्चस्वापासून रोखताना वेगवान ठोसे दिले. बॉक्सिंगमध्ये कझाकस्तान प्रबळ आहे. त्याचीच प्रचिती मेरीला आली. 

मेरीची ही सातवी आशियाई स्पर्धा होती. त्यात तिला दुसऱ्यांदा रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. यापूर्वी २००८ मध्य तिच्यावर ही वेळ आली होती. तिने २००३, २००५, २०१०, २०१२ आणि २०१७ च्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. सरितानेही या स्पर्धेत पाच सुवर्णपदके जिंकली आहेत. तिच्यापेक्षा सरस कामगिरी करण्यात मेरीला अपयश आले.  

भारत सहयजमान असलेल्या या स्पर्धेत सोमवारी अमित पंघल, शिवा थापा, संजीव सोमवारी सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रयत्न करतील. भारताने या स्पर्धेतील चौदा पदके निश्चित केली आहेत.


​ ​

संबंधित बातम्या