एकच फाईट वातावरण टाईट; पुरुषाला नमवत महिलेनं पटकावलं 1 मिलियनचं बक्षीस (VIDEO)

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 10 February 2021

पुरुष प्रतिस्पर्ध्यासोबत लढू शकते हे मी दाखवून दिले आहे. अनेकांनी या सामन्याकडे महिला वर्सेस पुरुष अशा दृष्टिने पाहिले, पण माझ्यासाठी फक्त हा एक सामनाच होता.  

लाइटवेट स्टार जूलिया पाजिकने प्रोफेशनल फाइटर्स लीग सीजनच्या दरम्यान पुरुष प्रतिस्पर्धीला तारे दाखवत अनोखा पराक्रम आपल्या नावे नोंदवला. तिने  स्टेफनला पराभूत करत एक मिलियन डॉलरचे बक्षीस मिळवले आहे. बक्षीसाची सर्व रक्कम तिने आपल्या आईला भेट म्हणून दिलीय.

व्यावसायिक फाइटिंगमध्ये 3-0 असे गुण मिळवत 1 मिलियनचं बक्षीस मिळवणाऱ्या मोजक्या मंडळीत तिने आपल्या नाव कोरले आहे. जूलियाने कायला हॅरिसन, सिंडी डांडोइस, गेना फाबियान, ओलेना कोलेसनेक, मारियाना मोरीस, लारिसा पाचेको आणि लॉरा सांचेज यांच्यासोबत फायटिंगमध्ये पदार्ण केले होते.

लढतीचा व्हिडिओ

ISL 2021 : 22 वय.. 21 मिनिटे.. 3 गोल.. 'काश्मिरी' पंडिताची कमाल! 

पुरुष प्रतिस्पर्ध्याला पराभूत केल्यानंतर जूलिया म्हणाली की, हा विजय खूप समाधान देणारा होता. विजयानंतर कौतुकांचा वर्षाव होत आहे. ईमेल शुभेच्छा संदेशांनी भरला आहे. पुरुष प्रतिस्पर्ध्यासोबत लढू शकते हे मी दाखवून दिले आहे. अनेकांनी या सामन्याकडे महिला वर्सेस पुरुष अशा दृष्टिने पाहिले, पण माझ्यासाठी फक्त हा एक सामनाच होता, अशी भावना तिने व्यक्त केली आहे.   

 


​ ​

संबंधित बातम्या