WWE तारा निखळला; ल्यूक हार्परचं फुफ्फुसाच्या आजाराने निधन

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 27 December 2020

"माझा जिवलग मित्र मला एकटीला सोडून आपल्यातून निघून गेला. हे शब्द कधीच लिहायचे नव्हते. माझ्यासाठी ही घटना हृदय पिळवटून टाकणारी अशी आहे. तो माझा जिवलग मित्र, एक चांगला पती आणि खूप चांगला पिताही होता"

Jon Huber WWEs Luke Harper dies : WWE च्या  रिंगमध्ये प्रतिस्पर्ध्यांला मात देणाऱ्या जॉन हूबेर उर्फ ल्यूक हार्परने (WWE मध्ये त्याला या नावाने ओळखले जायचे) आयुष्याची लढाई जिंकण्यात अपयशी ठरला आहे. डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) सुपरस्टार आणि माजी आयसी चॅम्पियन ल्यूक हार्पर (Luke Harper) याचे वयाच्या 41 व्या वर्षी निधन झालं. ल्यूक हार्पर फुफ्फुसाच्या आजाराने दीर्घकाळ त्रस्त होता.

पत्नीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली माहिती-

ल्यूक हार्परच्या निधनाची बातमी त्याची पत्नी अमांडा (Amanda) हिने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली. लूकचे फुफ्फुसाच्या संसर्गामुळे निधन झाले आहे. अमांडा  हिने पोस्टमध्ये लिहिलंय की, "माझा जिवलग मित्र मला एकटीला सोडून आपल्यातून निघून गेला. हे शब्द कधीच लिहायचे नव्हते. माझ्यासाठी ही घटना हृदय पिळवटून टाकणारी अशी आहे. तो माझा जिवलग मित्र, एक चांगला पती आणि खूप चांगला पिताही होता"

ल्यूक हार्परच्या मृत्यूने चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. ल्यूकचे रिंगच्या बाहेर सगळ्या प्रतिस्पर्ध्यांसोबत चांगले मैत्रीचे संबंध होते. भारतातही ल्यूकचे मोठे चाहते आहेत.

 


​ ​

संबंधित बातम्या