ऑलिंपिक प्रेक्षकांविनाच; जपानचे पंतप्रधान सुगा यांचे प्रतिपादन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 July 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा प्रेक्षकांविना होऊ शकतात, हा पर्याय अद्यापही खुला असल्याचे जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी सांगितले. दरम्यान, सामोआने आपले वेटलिफ्टर ऑलिंपिक स्पर्धेसाठी न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. 

टोकियो - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा प्रेक्षकांविना होऊ शकतात, हा पर्याय अद्यापही खुला असल्याचे जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी सांगितले. दरम्यान, सामोआने आपले वेटलिफ्टर ऑलिंपिक स्पर्धेसाठी न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. 

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा २३ जुलैपासून सुरू होतील. या स्पर्धेस अजून जपानवासीयांचा कडवा विरोध आहे. स्पर्धेनंतर जपानमधील कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढतील, असा इशारा जपानमधील आरोग्यतज्ज्ञ देत आहेत. आता या पार्श्वभूमीवर सुगा यांनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा प्रेक्षकांविना होऊ शकते, असे सांगितले. जपानच्या सत्ताधारी आघाडीतील एका लहान पक्षाने ही सूचना केल्यानंतर सुगा यांनी हे मत व्यक्त केले. टोकियोत गुरुवारी कोरोनाचे ६७३ नवे रुग्ण आढळले, तर बुधवारी ७१४. बुधवारची संख्या गेल्या काही महिन्यांतील सर्वाधिक आहे, याकडे अभ्यासकांनी लक्ष वेधले आहे. त्यांनी जुलैत ही संख्या एक हजार तसेच ऑगस्टमध्ये दोन हजार होईल, असा इशारा दिला आहे. 


​ ​

संबंधित बातम्या