ऑलिंपिक रद्द झाल्यास जपानला १७ अब्ज डॉलरचा फटका

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 May 2021

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बहुचर्चित ऑलिंपिक स्पर्धा रद्द झाली, तर जपानला १७ अब्ज डॉलरचा फटका बसू शकेल आणि हा त्यांच्यासाठी मोठा फटका असेल, असे एका अहवालत स्पष्ट करण्यात आले आहे.

टोकियो - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बहुचर्चित ऑलिंपिक स्पर्धा रद्द झाली, तर जपानला १७ अब्ज डॉलरचा फटका बसू शकेल आणि हा त्यांच्यासाठी मोठा फटका असेल, असे एका अहवालत स्पष्ट करण्यात आले आहे.

दोन महिन्यांवर आलेल्या ऑलिंपिक स्पर्धेचे भवितव्य अजूनही टांगणीवर आहे. एकीकडे स्थानिक जपानवासींचा कठोर विरोध सुरू असताना दुसरीकडे संयोजन समिती आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती स्पर्धा निश्चित कार्यक्रमानुसार खेळवण्यास तयार आहे. या मेगा स्पर्धेची तयारीही पूर्ण झालेली आहे. अशा परिस्थितीत जर स्पर्धा रद्द झाली, तर १७ अब्ज डॉलरचा तोटा जपानला सहन करावा लागेल.

जपानमध्ये पुन्हा कोरोनाची लाट आलेली आहे आणि अनेक शहरांत आणीबाणी लावण्यात आलेली आहे. या आणीबाणीमुळे अगोदरच जपानची अर्थव्यवस्था कमकुवत होऊ लागली आहे.


​ ​

संबंधित बातम्या