ISSF World Cup: संजीव राजपूत-तेजस्विनी सावंत यांनी भारताला मिळवून दिले अकरावे गोल्ड
राजपूत आणि तेजस्विनी सावंत ही जोडी सुरुवातीला 1-3 अशा पिछाडीवर होती. मात्र त्यांनी यातून सावरुन 5-3 अशी आघाडी घेतली.
भारतीय अनुभवी नेमबाज संजीव राजपूत आणि तेजस्विनी सावंत यांनी दिल्ली येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ वर्ल्ड कप स्पर्धेत सुवर्ण वेध घेतला. वर्ल्ड कपमध्ये त्यांनी भारतासाठी अकराव्या गोल्डची कमाई करुन दिली. 50 मीटर रायफल थ्री पोजिशन सांघिक प्रकारात या जोडीनं सुवर्ण कामगिरी केली. भारतीय जोडीने युक्रेनच्या सेरही कुलीश आणि अन्ना इलिना यांचा 31-29 अशा फरकाने मागे टाकत सुवर्ण पदक पटकावले.
ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर आणि सुनिधी चौहान या जोडीला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. या जोडीने अमेरिकेच्या तिमोथी शेरी आणि वर्जिनिया थ्रेशर या जोडीला 31-15 असे पराभूत केले. राजपूत आणि सावंत ही जोडी सुरुवातीला 1-3 अशा पिछाडीवर होती. मात्र त्यांनी यातून सावरुन 5-3 अशी आघाडी घेतली.
ISSF World Cup : भारताची सुवर्ण दशकपूर्ती
प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या कमबॅकचे इरादे उधळून लावत या जोडीने भारताच्या पदरात आणखी एका सुवर्णाची भर घातली. पात्रता फेरीत संजीव आणि तेजस्विनी 588 अंकासह अव्वलस्थानी राहिले होते. अंतिम फेरीत त्यांनी 294 अंक मिळवले. पात्रता फेरीत 580 अंकासह चौथ्या स्थानावर राहिलेल्या तोमर आणि सुनिधी जोडी कांस्य पदकासाठी खेळली. भारत भारत भारत