दुबईतील आयर्नमॅनचा किताब डॅा. स्मिता झांजुर्णे यांनी पटकावला

डॅा. स्मिता झांझुर्णे
Tuesday, 13 April 2021

दुबईमध्ये झालेल्या स्पर्धेत मानाचा आयर्नमॅनचा किताब डॅा. स्मिता झांजुर्णे यांनी पटकावला आहे.

हडपसर - दुबईमध्ये झालेल्या स्पर्धेत मानाचा आयर्नमॅनचा किताब डॅा. स्मिता झांजुर्णे यांनी पटकावला आहे. आयर्नमॅन स्पर्धेत २ किलोमीटर समुद्रात स्विमिग, ९० किमी वाळवंटातील सायकलिंग आणि २१ किलोमिटर रनिंग करावे लागते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये दिलेल अंतर साडेआठ तासांत पूर्ण करावे लागते. गेल्यावर्षी त्यांचे पती डॅा. राहूल झांजुर्णे यांनी हा किताब पटकवला होता. त्यांचा आदर्श ठेवत त्यांनी खडतर परिश्रम करून यावर्षी यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे सर्वस्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. 

डॅा. स्मिता यांना पोहता येत नव्हत. थंडीच्या महिन्यामध्येच पोहण्याचे प्रशिक्षण सुरू केले आणि लॅाकडाउन झाला. स्विमिंग पूल बंद झाल्यामुळे ट्रेनिंगचा खेळखंडोबाच झाला. आयर्न मॅनची स्पर्धा होण्याची चिन्ह दिसत नव्हती. त्यात घरातच कोरोना पॉसिटीव्ह पेशंट निघाला. अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी ट्रेनिंग चालू ठेवलं, ते कधीतरी ही स्पर्धा होईल या आशेवर. थंडीच्या महिन्यात हाडं गोठवणार्‍या, बंदिस्त स्विमिंग पुलच्या बर्फासारख्या थंड पाण्यात, दोन अडीच महिन्यात न येणारी गोष्ट शिकणं त्यांच्यासाठी खरंच कठीण होतं. मात्र निश्चय पक्का असल्याने दररोज न चुकता पहाटे चार वाजता उठून पाच सव्वा पाच वाजता पाण्यात बुडिमाराण आणि आल्यावर परत रनिंग आणि सायकलिंग करत होत्या. एकदाची १२ मार्च रोजीची त्यांची स्पर्धा ठरली व त्यात सहभाग घेतला. मोठमोठ्या उसळत्या लाटा, समुद्राचं खारं पाणी आणि परत फिरल्यावर तापलेल्या सूर्याची डोळ्यात घुसणारी किरणं यांच्यावर मात करून 58 मिनिटांत म्हणजेच बारा मिनिटे राखून स्विमिंग पूर्ण केल.

अनपेक्षित गोष्टींनी त्यांची सायकल रेस खचाखच भरली होती. त्यांच्या सायकलींगचे सामान ठेवलेली ट्रान्झिशन बॅग कुणीतरी उचलून नेली. ती शोधण्यात सहा मिनिट गेली. प्रचंड उलटे वारे आणि वाळवंटातील 39°c घ्या तापत्या उन्हाने त्यांची चांगलीच फिरकी घेतली. मात्र निश्चय पक्का असल्याने त्यांनी हे ९० किलोमटरचे सायकलिंग वेळेत पूर्ण केले. 

प्रत्येक वेळेस डॅा. स्मिता यांनी मनाला बजावत एकदाही न थांबता 21 किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण केलं. "स्मिता हि शेवटची 30 मिनिट तुझ्या आयुष्यात परत कधीच येणार नाहीत "....असं त्यांचे पती ओरडून सांगत होते, आणि त्याच्यानंतर त्या धावतच सुटल्या. पतीने हातात भारताचा झेंडा दिला आणि डोळ्यासमोर खुणावणारी फिनिश लाईन दिसली. त्यांच्या आनंदाला उधाण आलं. त्यांनी फिनिश लाईन क्रॅास केली, त्यांच्या कष्टाचे चीज झाले आणि त्या "आयर्नमॅन" झाल्या. 
 


​ ​

संबंधित बातम्या