भारताचा पहिला चमू पॅरालिंपिक स्पर्धेसाठी टोकियोत दाखल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 August 2021

उंच उडी खेळाडू मरियप्पन थंगवेलू, इतर दोन अॅथलीट आणि सहा सपोर्ट स्टाफ असा भारताचा पहिला चमू पॅरालिंपिक स्पर्धेसाठी टोकियोत बुधवारी सकाळी दाखल झाला.

टोकियो - उंच उडी खेळाडू मरियप्पन थंगवेलू, इतर दोन अॅथलीट आणि सहा सपोर्ट स्टाफ असा भारताचा पहिला चमू पॅरालिंपिक स्पर्धेसाठी टोकियोत बुधवारी सकाळी दाखल झाला. 

भारताचे इतर खेळाडू त्यांच्या स्पर्धांनुसार टोकियोस रवाना होणार आहे. मरियप्पन हा भारताचा ध्वजधारक असणार आहे. त्याने रियो पॅरालिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्याच्यासह थाळीफेक खेळाडू विनोद कुमार आणि भालाफेक खेळाडू तेक चंदही टोकियोत दाखल झाले आहेत.

टोकियोस रवाना होताना हे तीन खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि पॅरालिंपिक समितीच्या सदस्यांनी दिल्ली विमानतळावर निरोप दिला. भारतीय संघातील सर्व खेळाडूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुभेच्छा दिल्या.


​ ​

संबंधित बातम्या