विश्वकरंडक तिरंदाजीतून भारतीय संघाची माघार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 May 2021

भारतातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे अमलात आणल्या जात असलेल्या प्रवास निर्बंधांचा फटका भारतीय तिरंदाजी संघास बसला. त्यामुळे ल्युसान विश्वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत भारताचे तिरंदाज सहभागी होणार नाहीत.

मुंबई - भारतातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे अमलात आणल्या जात असलेल्या प्रवास निर्बंधांचा फटका भारतीय तिरंदाजी संघास बसला. त्यामुळे ल्युसान विश्वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत भारताचे तिरंदाज सहभागी होणार नाहीत. 

भारतीयांवर असलेले प्रवासाचे निर्बंध हा प्रश्न आहेच, पण त्याचबरोबर मायदेशी परतल्यावरचे विलगीकरण हाही प्रश्न आहे. ग्वाटेमाला स्पर्धेनंतरचे विलगीकरण नुकतेच संपत आहे. त्यामुळे तिरंदाजांचा सराव नाही. त्याचबरोबर जूनमधील पॅरिस विश्वकरंडक स्पर्धा महिला तिरंदाजांच्या पात्रतेसाठी मोलाची आहे, हाही विचार आम्ही केला आहे, असे भारतीय तिरंदाजी संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर यांनी सांगितले. पॅरिस स्पर्धेसाठी व्हिसा मिळवण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

ल्युसान विश्वकरंडक स्पर्धा १७ ते २३ मे दरम्यान होणार आहे. ही स्पर्धा पॅरिस स्पर्धेच्या (२१ ते २७ जून) पूर्वतयारीसाठी मोलाची असेल, भारताचा पुरुष तिरंदाजी संघ ऑलिंपिकला पात्र ठरला आहे. महिला तिरंदाजी संघास पात्रतेसाठी पॅरिस स्पर्धेतील यश आवश्यक आहे.


​ ​

संबंधित बातम्या