30 सेकंदात बजरंग पुनिया बनला जगातील एक नंबरचा पैलवान 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Monday, 8 March 2021

अंतिम सामन्यातील अखेरच्या फेरीत बजरंग पुनिया 0-2 अशा फरकाने पिछाडीवर होता. अखेरच्या क्षणात दोन पॉइंट घेत त्याने सामना बरोबरीत आणला.

टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीत व्यस्त असलेला भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने गोल्डन कामगिरीसर आपल्या वजनी गटातील क्रमवारीत अव्वलस्थान गाठले. रोम येथील माटियोपेलिकॉन रँकिंग कुस्ती स्पर्धेतील लढतीत अखेरच्या 30 सेकंदात दोन पॉइंट मिळवत पुनियाने बाजी  मारली. त्याने मंगोलियाच्या तुलगा तुमूर ओशिर याला बरोबरीत रोखले. या बरोबरीसह 65 किलो वजनी गटात त्याने पुन्हा एकदा अव्वलस्थान मिळवले आहे. 

अंतिम सामन्यातील अखेरच्या फेरीत बजरंग पुनिया 0-2 अशा फरकाने पिछाडीवर होता. अखेरच्या क्षणात दोन पॉइंट घेत त्याने सामना बरोबरीत आणला.  रविवारी झालेल्या लढतीत बजरंग पुनियाने अखेरचा पॉइंट मिळवला होता. याच आधारावर या अंतिम लढतीत त्याला विजय घोषित करण्यात आले. बजरंग पुनिया या लढतीपूर्वी आपल्या वजनी गटातील जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर होता. या स्पर्धेत मिळवलेल्या 14 गुणांच्या जोरावर त्याने आघाडी मिळवली आहे.  ताजी रँकीग या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर आहे. त्यामुळे बजरंगला गोल्डन कामगिरीचा मोठा फायदा झाला. 

विनेशच्या ताकदीला तोड नाही ; आठवड्याभरातील दुसऱ्या सुवर्णासह ठरली जगात भारी
 

विशाल कालीरमण याने बिगर ऑलिम्पिक वर्गवारीत 70 किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या सीरबाज तालगत ला 5-1 ने पराभूत करत कांस्य पदकाची कमाई केली. दुसरीकडे डोपिंगच्या निर्बंधानंतर आखाड्यात परतलेल्या नरसिंह यादव याला रौप्य पदकासाठीच्या लढतीत कझाकिस्तानच्या दानियार कैसानोव यांच्या विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. 


​ ​

संबंधित बातम्या